उरुळीकांचन’ च्या ग्रामसचिवालयाने गावच्या वैभवात निश्चितच भर ! नवीन उभारलेल्या ग्रामसचिवालयाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले उद्घाटन ; जुन्या आठवणींना दिला उजाळा….


उरुळी कांचन : पुणे जिल्ह्यात औद्योगिक विकासाचा पाया घट्ट झाल्याने शहरीकरणाचा वेग वाढला आहे. पायाभूत सुविधांना प्राधान्यता देण्यात सत्ताधाऱ्यांनी अधिक प्रयत्न केले पाहिजेत.जिल्ह्यातील विकासात एकसूत्रता राहिल्यास काम अधिक वेगाने व गतीने होण्यास मदत मिळणार आहे. त्यामुळे भविष्याचा वेध घेऊन कामे झाल्यास अधिक समाधान वाटणार असून उरुळीकांचन ग्रामपंचायतीने वैभवास साजेशी अशी इमारत बांधल्याने पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक वाटते असे गौरवउद्गार शरद पवार यांनी काढले.

 

उरुळी कांचन (ता.हवेली ) येथे ग्रामपंचायतीने नव्याने उभारलेल्या ग्रामसचिवालयाचे उद्घाटन ज्येष्ठ नेते शरद पवार
यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शरद पवार बोलत होते. या कार्यक्रमासाठी खासदार अमोल कोल्हे, आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके ,माजी आमदार अशोक पवार, रमेश थोरात, जग्गन्नाथ शेवाळे, जिल्हा बँकेचे संचालक प्रदिप कंद, प्रा.के.डी.कांचन, महादेव कांचन, पुणे बाजार समितीचे सभापती प्रकाश जगताप, संचालक राजाराम कांचन,  पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संदिप भोंडवे, सरपंच ऋतुजा कांचन ,उपसरपंच स्वप्नीशा कांचन ,’यशवंत’चे संचालक संतोष कांचन,माजी सरपंच दत्तात्रय कांचन, संतोष उर्फ पप्पू कांचन, अमित कांचन, मयूर कांचन, अजिंक्य कांचन आदी उपस्थित होते.

 

शरद पवार पुढे म्हणाले की, देशाच्या व राज्याच्या घडणीत उरुळी कांचन गावने अनेक चांगले नेते व कार्यकर्ते दिले आहेत.राजकीय, सहकार व साहित्यिक या ठिकाणी घडून त्यांनी देशातकाम केले आहे. आपल्या नेत्यामागे कसे भक्कम उभे रहावे असे कार्यकर्ते या ठिकाणी घडले आहे. राज्यातील अनेक निर्णय या भूमितून घडले आहेत. आजही या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावे असे नेतृत्व या गावाने दिले आहेत. डॉ. मणिभाई देसाई यांनी हरित व दूधक्रांती येथून जगभरात पोहचविले आहे. जिल्ह्यात अलिकडे औद्योगिकीकरण होतअसतानाजिल्ह्यातील पुरंदर विमानतळ असो की अन्य प्रकल्प या ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी पुढील २५-३० वर्षाचा वेध घेऊन काम केले पाहिजे उरुळीकांचनच्या शिक्षण संस्थेतून मी काम करीत असल्याने शिक्षणाच्या अनेक बाबी पूर्ण झाल्या आहेत. अनेक उद्योगपतीपुढे आल्याने मोठे काम केले आहे.

 

खा. अमोल कोल्हे म्हणाले, यवत – हडपसर इलिव्हेटेड मार्गाचे काम हे केंद्राचे असून राज्य सरकार आता या प्रकल्पात घुसले आहे. एमएसआरडीसी च्या डीपीआर मध्ये काही एक्सिट मार्ग काढले असून त्यात बदल करण्यास अजित पवार यांच्याशी चर्चा करणार आहे .

 

आमदार ज्ञानेश्वर कटके म्हणाले,मतदारसंघात मेट्रो शहरातून वाघोलीपर्यंत जोडली असून उन्नत मार्गातून मेट्रो उरुळीकांचन पर्यंत आणण्याचा प्रयत्न आहे. सोलापूर रोड व नगर रोडला उन्नत मार्गातून इलिव्हेटेड मार्गांना मंजुरी दिली आहे. त्यानुसार निविदा प्रक्रिया सुरू आहे.त्यामुळे भविष्यात वाहतुकीची अडचण सुटणार आहे. तसेच या ठिकाणी रेल्वे टर्मिनल उभारुन रेल्वेची कनेक्टिव्हिटी जोडणार आहे.शहरातून लोहगाव विमानतळ ते नव्याने होणाऱ्या पुरंदर विमानतळाला जोडण्यासाठी १५०० कोटी रुपये खर्चून रस्ते बांधणे व वाढविणे असे नियोजन आहे. वाढणाऱ्या नर्सरी उद्योगाला विमानतळाशी जोड देऊन हॉर्टीकल्चर हब म्हणून मान्यता देऊन स्थानिकांना रोजगार देऊन व्यावसायिकांच्या मालाला जगभर पसंती देण्याचा मानस आहे.

 

प्रस्ताविकात सरपंच ऋतुजा कांचन यांनी महात्मा गांधीसर्वोदय संघाच्या शैक्षणिक संकुल व शैक्षणिक सुविधांना भरीवअसा निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल आभार माणून भविष्यात या भागाच्या अधिक शैक्षणिक सुविधांसाठी आपला आधार कायम रहावा अशी मागणी केली.

 

सरपंचांना खुर्चीवर बसवून दिले आदराचे स्थान

ग्रामविकासलयाचे उद्घाटन करताना श्री शरद पवार यांनी नवीन प्रशस्त कार्यालयाची पाहणी केली. या दरम्यान पवार यांनी सरपंच कक्षाला भेट दिली. यावेळी त्यांची कृती उपस्थित नागरीकांना बुचकळ्यात टाकणारी ठरली. त्यांनी सरपंचांनी खुर्चीवर बसण्याचा विनंतीला नकार देत त्यांनी खुर्चीची गरिमा राखत त्यांनी आदराने  सरपंच ऋतुजा कांचन यांना आसनाधिस्त केले. तर कामकाजात पुरुषांना हस्तक्षेप करु देऊ नका अशीही मिश्कीली मारली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!