मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या विरोधात गुणरत्न सदावर्तेनीं उचललं मोठं पाऊल ; आंदोलनाच काय होणार?


मुंबई : मुंबईतील आझाद मैदानावर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातनू आरक्षण द्यावे, अशी मागणी करत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. मुंबईतील आझाद मैदानावर हे आंदोलन चालू झाले असून त्यांच्या समर्थनार्थ हजारो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. असे असतानाच आता अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी एका नियमाचा आधार घेत जरांगे यांच्याविरोधात मोठे पाऊल उचलले आहे. सदावर्ते यांच्या या निर्णयामुळे आंदोलनाच पुढे काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

सदावर्ते यांनी नेमकं काय केलं आहे?

गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांना मुंबईत आंदोलनाला परवानगी देऊ नये, अशी मागणी याआधी केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा सदावर्ते यांनी कायद्याचा आधार घेत जरांगे यांच्याविरोधात दंड थोपडले आहेत. जरांगे यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेअंतर्गत तसेच मुंबई पोलीस अधिनियम 1951 अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे सदावर्ते यांनी जरांगे यांच्याविरोदात ऑनलाईन पद्धतीने एक तक्रारही दाखल केली आहे. त्यामुळे पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागला आहे.

मनोज जरांगे यांना यांना 29 ऑगस्ट रोजी फक्त सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंतच आंदोलन करण्याची परवानगी होती. जरांगे यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे, पोलिसांनी घालून दिलेल्या अटींचे उल्लंघन केले आहे. तसेच कायद्याचे फक्त उल्लंघन केलेले नाही तर त्यांनी कायदा मोडून-तोडून काढले आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात मोठी कारवाई व्हावी, अशीही मागणी सदावर्ते यांनी केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!