जय हनुमान तरुण मंडळाकडून गणरायाची दिमाखात प्रतिष्ठापना, गणेश फेस्टिवलतर्फे अनेक सामाजिक उपक्रमांचे आयोजन…


इंदापूर : तालुक्यातील भवानीनगर गायकवाडवस्ती येथील जय हनुमान तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मोठ्या दिमाखात गणरायाचे स्वागत केले आहे. या मंडळाकडून दरवर्षी लोकउपयोगी सामाजिक उपक्रम राबविले जातात. यावेळी देखील गणेश फेस्टिवल 2025 चे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये लहान मुले, महिला तसेच तरुणांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या उपक्रम राबविले जाणार आहे. तसेच सामाजीक बांधिलकी म्हणून नेहेमीप्रमाणे वृक्षारोपण केले जाणार आहे. तसेच व्यसनमुक्ती, बालविवाह अशा अनेक सामाजीक प्रश्नांवर हे तरुण जनजागृती करत आहेत. तसेच अनेक स्पर्धा देखील आयोजित करण्यात आल्या आहेत.

यामध्ये मोठ्या प्रमाणावर बक्षिसे आणि लकी ड्रॉ देखील काढण्यात येणार आहे. मंडळात दरवर्षी अनेक नवीन आणि समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्यासाठी अनेक गोष्टी केल्या जातात. असेही यावेळी मंडळाच्या सदस्यांनी सांगितले. तसेच लहान मुलांसाठी बाल संस्कार देखील आयोजित करण्यात आले आहेत.

यामध्ये लहान मुलांना मार्गदर्शन केले जाते. यावेळी मोठ्या संख्येने सर्व उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे. मंडळाच्या या उपक्रमांचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे. तसेच सर्वजण उस्फुर्त प्रतिसाद देत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!