पुणे मेट्रो गणेशोत्सवासाठी सज्ज! गर्दीवर नियंत्रणासाठी प्रशासनाचे महत्त्वाचे निर्णय…


पुणे : पुणे शहरात गणेशोत्सवाची सुरुवात अतिशय उत्साहात आणि जल्लोषात झाली आहे. सर्व मानाच्या गणपतींची थाटात मिरवणूक काढून प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. त्यामळे आता पुण्यातील मध्यवर्ती भागात बाप्पांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या वाढली आहे.

ही वाढती गर्दी लक्षात घेऊन पुणे मेट्रोने प्रवाशांसाठी काही महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. महामेट्रोकडून सांगण्यात आले आहे की, गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि प्रवाशांचा अनुभव सुखकर ठेवण्यासाठी या उपाययोजना करण्यात येत आहेत.

सध्या पुणे मेट्रोची दैनंदिन प्रवासी संख्या 2 लाख 15 हजार इतकी आहे. परंतु गणेशोत्सव काळात ही संख्या वाढून 5 लाखांवर जाण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. त्यामुळे गर्दीच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी मेट्रो प्रशासनाने काही ठराविक मार्गांवर पर्यायी स्थानकांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड मनपा ते स्वारगेट मार्गिकेवरील प्रवाशांनी गणपती दर्शनासाठी कसबा पेठ स्थानक वापरणे सुचवले आहे. या स्थानकातून विविध मानाच्या गणपती मंडळांपर्यंत पायी जाता येते.

वनाज ते रामवाडी मार्गिकेवरील प्रवाशांनी पुणे महानगरपालिका, छत्रपती संभाजी उद्यान किंवा डेक्कन जिमखाना स्थानक वापरावीत. विशेष म्हणजे, अत्यंत गर्दीची शक्यता लक्षात घेता मंडई स्थानक वापरणे टाळावे, असे मेट्रोकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रवाशांसाठी महत्त्वाचे नियम…

तिकीट खरेदीसाठी डिजिटल तिकीट, व्हॉट्सअ‍ॅप तिकीट किंवा वन पुणे कार्ड वापरण्याचा सल्ला
लिफ्टचा वापर वृद्ध, महिला आणि गरजू प्रवाशांसाठीच राखून ठेवावा शिस्तबद्ध रांगेत प्रवेश व निर्गमन करावा
अनावश्यक गर्दी किंवा थांबणे टाळावे

गणेशोत्सवात भाविक आणि प्रवाशांनी पुणे मेट्रो, पोलिस आणि महानगरपालिका प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सुरक्षित आणि आनंददायी प्रवासासाठी सर्वांनी नियमांचे पालन करून शिस्त राखावी, असे पुणे मेट्रो प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!