पुणे- पिंपरीतील वाहतूक कोंडी फुटणार ; नरे ते देहू रोडपर्यंत पुणे -बेंगलोर एलिव्हेटेड कॉरिडोरला मंजुरी, केंद्रीय मंत्र्यांचा निर्णय


पुणे : पुणे पिंपरीतील वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.पुणे-बेंगळुरू महामार्गावरील (एनएच-४८) वाहतुकीवरील प्रचंड दबाव आणि वाढत्या शहरीकरणामुळे निर्माण होणाऱ्या अडचणींवर कायमस्वरूपी तोडगा निघण्यासाठी केंद्र सरकारने गती दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड हद्दीतील प्रस्तावित उन्नत कॉरिडॉरचे काम जलदगतीने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश मंत्रालय आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (एनएचएआय) दिले आहेत. त्यांनी उच्चस्तरीय बैठकीत या प्रकल्पाचा पाठपुरावा करताना तो लवकर केंद्रीय मंत्रिमंडळावर सादर केला जाईल असं सांगितलं.३२ किलोमीटर लांबीचा हा उन्नत कॉरिडॉर अंदाजे ₹५,५०० कोटी ते ₹६,००० कोटी खर्चाचा असून गेल्या जवळपास चार वर्षांपासून तो केवळ कागदावरच आहे. या संदर्भात सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) आधीच तयार करण्यात आला आहे. या योजनेचे दोन पॅकेजेस करण्यात आले आहेत. देहू रोड ते पाषाण-सुस आणि पाषाण-सुस ते नर्हे. आता नरे ते देहू रोडपर्यंत पुणे -बेंगलोर एलिव्हेटेड कॉरिडरला अखेर मंजुरी देण्यात आली आहे.

याबाबत मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निविदा प्रक्रिया देखील तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले, जेणेकरून मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर वेळ वाया न घालवता प्रकल्प पुढे नेता येईल. एनएचएआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, हा निर्णय प्रकल्पाला आवश्यक गती देण्यासाठी महत्त्वाचा टप्पा आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!