महिलेचे एक लाख रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून चोरून नेणाऱ्या अल्पवयीन चोरटा जेरबंद. गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पथकाची कामगिरी….


लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील केसनंद रस्ता येथे एका महिलेचे एक लाख रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून चोरून नेणाऱ्या अल्पवयीन चोरट्याला गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पथकाने निगडी येथून ताब्यात घेतले. याबाबत महिलेने गुरुवार (२१ ऑगस्ट) रोजी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २१ ऑगस्ट रोजी सदर महिला वाघोली येथील केसनंद रत्यावरून पायी घराकडे निघाली होती. त्यावेळी तिच्या मागून दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी तिच्या गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावून चोरून नेली. याबाबत माहिलेने पोलिसांत तक्रार दिली होती. याबाबत वाघोली पोलिसांकडून याबाबत तपास सुरू होता.

या घटनेचा समांतर तपास करण्याचे आदेश गुन्हे शाखेच्या युनिट सहाचे वरिष्ठ निरीक्षक वाहिद पठाण यांनी पथकाला दिले होते. त्यानंतर युनिट सहाच्या पथकाने घटनास्थळ तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि काही अनोळखी व्यक्तींचे फोटो मिळवले. त्यानंतर पोलीस अंमलदार नितीन मुंढे यांनी आरोपींची ओळख निश्चित केली.

मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने सहायक निरीक्षक मदन कांबळे, हवालदार कानिफनाथ कारखेले, निर्णय लांडे, अंमलदार शेखर काटे यांचे पथक बीड येथे तपासासाठी रवाना झाले. तेथे पोहोचले नंतर या गुन्ह्यातील आरोपी हा तळवडे येथील गणेशनगर येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर युनिट सहाच्या पथकाने तळवडे येथे सापळा रचून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक दुचाकी आणि चोरीला गेलेले एक लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र असा ऐवज जप्त केला आहे. यांतील दुसरा आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

सदर कारवाई गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक, निरीक्षक पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राकेश कदम, कांबळे, अंमलदार सारंग दळे, बाळासाहेब सकटे, प्रशांत कापुरे, निलेश साळवे, मुंढे, कारखेले, गिरीष नाणेकर, सुहास तांबेकर, सचिन पवार, लांडे, नेहा तापकीर, ऋषीकेश ताकवणे, नितिन धाडगे, ऋषीकेश व्यवहारे, काटे, बाळासाहेब तनपुरे, प्रतिक्षा पानसरे, कीर्ती मांदळे, सोनाली नरवडे यांच्या पथकाने केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!