मोठी बातमी! मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची महत्त्वाची बैठक ; युतीबाबत काय निर्णय?

पुणे : बेस्ट पतपेढीची निवडणूक एकत्रित लढवूनही अपयशाला समोर जावं लागलेल्या मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीची चर्चा गेल्या काही दिवसापासून होत आहे. त्यानंतर आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मनसे आणि ठाकरे गट एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू असतानाच आता शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एक महत्त्वाची बैठक पार पडली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आल आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात झालेल्या बैठकीत मनपा, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत हे दोन्ही पक्ष पहिल्यांदाच एकत्र आले असून, आगामी निवडणुका एकत्र लढविण्याचे संकेत या बैठकीतून मिळाले आहेत.
मालेगावमध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच मनसे आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये बैठक पार पडली आहे. मालेगावच्या महापालिका निवडणुकीत या नव्या समीकरणामुळे मोठा बदल होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या बैठकीला मनसे व शिवसेना ठाकरे गटातील प्रमुख पदाधिकारी, तसेच स्थानिक नेते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
