धक्कादायक! पुण्यात फेशर्स पार्टीच्या नावाखाली पोरांना दारूचा पुरवठा, मनविसेंच्या कार्यकर्त्यांशी धाड पडताच.

पुणे: गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमुळे पुणे चांगलेच चर्चेत येत आहे.अशातच आता राजाबहादूर मिल्स येथील किकी नावाच्या पबमध्ये नामांकित कॉलेजमधील तरुण तरुणींची फ्रेशर्स पार्टी आयोजित करण्यात आली होती. या प्रेशर पार्टीच्या नावाखाली पब मध्ये अल्पवयीन मुलांना दारूचा पुरवठा होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली.या पार्टीवर मनसैनिकांनी धडक देत पार्टी बंद पाडली.यावेळी पब चालकांकडून कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र तपासले गेले नाही. तसेच प्रवेशासाठी कोणतीही रेकॉर्ड रजिस्टरही ठेवले गेले नसल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फ्रेशर्स पार्टीत १७ ते २१ वयोगटातील अनेक विद्यार्थ्यांना विनाअडथळा प्रवेश देण्यात आले. तसेच त्यांना मद्यही पुरवण्यात आले, असा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.मनविसेनं यावेळी पब चालकांना थेट इशाराही दिला. ‘यापुढे जर कुठल्याही पब किंवा रेस्टॉरंटमध्ये फ्रेशर्स पार्टीच्या नावाखाली अल्पवयीन मुलांना दारू पाजली, तर त्या पबची एकही काच शिल्लक ठेवली जाणार नाही; संपूर्ण पब फोडून टाकला जाईल’, असा इशारा त्यांनी दिला आहे.
दरम्यान या कारवाईमुळे पुणे शहरातील पब्समध्ये अल्पवयीन मुलांना सुरू असलेल्या बेकायदेशीर मद्यविक्रीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
