पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ ; भरदिवसा रस्त्यावर धारदार शस्त्र घेऊन मास्कमॅनचा वावर, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण…


पुणे : पिंपरी-चिंचवड शहरात रस्त्यावर भरदिवसा हातात धारदार चाकू घेऊन मास्क घालून वावरताना अज्ञात व्यक्ती दिसून आल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.निगडी परिसरात बजाज ऑटोमोबाईल समोरील एचपी पेट्रोल पंपाजवळ नागरिकांना त्याचा प्रत्यक्ष अनुभव आला. चेहऱ्यावर मास्क घालून ओळख लपवणारा हा व्यक्ती चाकू घेऊन रस्त्यावरून जात असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्यावर लोकांची वर्दळ असतानाही हातात शस्त्र घेऊन तो अज्ञात व्यक्ती बेधडकपणे रस्ता क्रॉस करत आहे. त्याच्या हातात चाकू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, अशा प्रकारे खुलेआम चाकूसह वावर करणाऱ्या व्यक्तीकडे कोणी जाऊ पाहत नाही. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान ही अज्ञात व्यक्ती गुन्हेगारी प्रवृत्तीची असल्याची भीती व्यक्त होत असून, तो कुठल्या गंभीर गुन्ह्याच्या तयारीत होता का, याचा तपास सुरू आहे.

स्थानिकांनी तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली असून, पिंपरी-चिंचवड पोलीस प्रशासनाने या व्हिडिओची सत्यता तपासण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांकडून सांगण्यात आले आहे की, अशा प्रकारे शस्त्र घेऊन फिरणाऱ्या व्यक्तीला कडक कारवाईचा सामना करावा लागेल. पोलिस पथके परिसरात गस्त घालून शोधमोहीम राबवत आहेत.या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गस्त व्यवस्था आणि सार्वजनिक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!