पुण्यात प्रेमप्रकरणातून सुडाचा थरार ; तरुण अभियंत्याचा निर्घृण खून, पोलिसांकडून तपास सुरू..


पुणे : गेल्या काही दिवसापासून गुन्हेगारी घटनांमुळे पुणे शहर चांगलेच चर्चेत येत आहे.अशातच आता पुणे जिल्ह्यातील मांगडेवाडी परिसरात मानलेल्या बहिणीच्या प्रेमप्रकरणातून सूड घेण्यासाठी एका तरुण अभियंत्याचा निर्घृण खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या खूनामुळे संपूर्ण पुण्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणाचे नाव सौरभ स्वामी आठवले (वय २५) असून तो संगणक अभियंता होता. सौरभ हा आपल्या परिसरातील एका अल्पवयीन मुलीला बहीण मानत होता. तिच्या आयुष्याची काळजी घेणारा, तिला योग्य मार्गावर ठेवणारा सौरभ याला त्या मुलीच्या प्रेमसंबंधांची माहिती मिळाली. हे प्रेमसंबंध तीने तिच्या घरच्यांपासून लपवले होते. सौरभने बहिणीची जबाबदारी म्हणून तिच्या घरच्यांना हे सत्य सांगितले.परंतु या सत्याचा परिणाम वेगळाच झाला. तिच्या अल्पवयीन प्रियकराने सूडातून हत्येचाचा कट रचला होता. त्याने आपल्या तीन मित्रांना श्रीमंत अनिल गुज्जे, संगम नामदेव क्षीरसागर आणि नितीन त्र्यंबक शिंदे यांना सोबत घेतले. या चौघांनी मिळून सौरभला घराखाली बोलावले,जबरदस्तीने गाडीवर बसवले आणि दुर्गम डोंगरावर नेले. तिथे निर्घृणपणे धारदार हत्यारांनी सौरभवर हल्ला चढवून त्याला जीवे मारले.

दरम्यान दुसऱ्या दिवशी घरच्यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांकडून तपास सुरू असता राजगड पोलिसांना शिंदेवाडी गावच्या डोंगरात एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. सौरभचा मृतदेह पाहून पोलिसांनाही धक्का बसला.या हत्येप्रकरणी राजगड पोलिसांनी तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींना ताब्यात घेतले. या गुन्ह्यात वापरण्यात आलेले ॲक्टिव्हा, स्प्लेंडर मोटरसायकल, मोबाईल फोन व हत्यारे जप्त करण्यात आली. तसेच भोर न्यायालयाने आरोपींना २८ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा अधिक तपास राजगड पोलिस करत आहेत

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!