महापालिकेची प्रभाग रचना कधी जाहीर होणार? तारीखही ठरली, इच्छुकांची उत्सुकता शिगेला…

पुणे : महापालिकेच्या आगामी निवडणुकीची प्रारुप प्रभाग रचना आज (शुक्रवारी) २२ ऑगस्टला संध्याकाळपर्यंत किंवा उद्या (शनिवारी) जाहीर होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ही प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाणार आहे.

तसेच प्रभाग रचनेमध्ये राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने मोठे बदल केल्याची चर्चा असून प्रभाग रचना नक्की कशी झाली आहे? याबाबत इच्छुकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. तर काही इच्छुकांनी मनासारखी प्रभाग रचना व्हावी यासाठी देव पाण्यात ठेवले आहेत.
आगामी महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने पुणे शहराच्या प्रभाग रचनेचे प्रारूप महापालिकेने नगर विकास विभागाला पाठविले आहे .हे प्रारूप निवडणूक आयोगामार्फत २२ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार असल्याचे निवडणूक कार्यक्रमात जाहीर करण्यात आले आहे .

राज्यातील बहुतांश महापालिका नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. यामुळे पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद, नगरपालिका यांच्या प्रारुप रचना प्रसिद्ध करून हरकती सूचना मागविण्यात आल्या आहेत. तर महानगरपालिका निवडणुकांसाठी २२ ऑगस्ट रोजी प्रभाग रचना जाहीर करून हरकती सूचना मागविण्यात येणार आहेत.
दरम्यान, मात्र सर्वच महापालिकांच्या प्रारूपांची स्कुटीनी करण्याचे काम एकाच वेळी करावे लागणार असल्याने काही महापालिकांचे स्क्रुटीनि रखडली आहे. आज रात्री उशिरापर्यंत पुणे महापालिकेची स्क्रुटीनी होऊ शकली नाही . उद्या दुपारपर्यंत हे काम होणे अपेक्षित आहे .
दुपारपर्यंत स्क्रुटीनी झाल्यास संध्याकाळी उशिरा प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध होईल. परंतु यापेक्षाही अधिक वेळ लागल्यास शनिवारी सकाळी ही रचना प्रसिद्ध करण्यात येईल अशी माहिती वरिष्ठ अधिकारी सूत्रांनी दिली.