आता खराब रस्त्यांवर टोलवसुली नाही!! सर्वोच्च न्यायालयाचा मोठा ऐतिहासिक निर्णय…


पुणे : गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे राज्यातील अनेक रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. अनेक ठिकाणी अपघातांच्या घटनेत वाढ झाली असून प्रवासाचा वेग देखील मंदावला आहे. असे असले तरी दुसऱ्या बाजूला मात्र टोल वसुली जोरात सुरू आहे. असे असताना मात्र आता एक दिलासादायक निर्णय पुढे आला आहे.

यामुळे प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पुणे ते कोल्हापूर व कागल ते बेळगांव या दोन्ही राष्ट्रीय महामार्गावर वाहनधारकाकडून टोल वसुली करता येणार नाही. काल याबाबत शेतकरी नेते राजू शेट्टी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना तातडीने या दोन्ही मार्गावरील टोल बंद करण्यात यावे याबाबत कायदेशीर मार्गाने नोटीस देण्यात आली आहे.

येत्या आठवड्याभरात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने याबाबत कार्यवाही न केल्यास पुढील आठवड्यात अवमान याचिका दाखल करणार असल्याचे देखील राजू शेट्टी यांनी सांगितले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

अनेक ठिकाणी रोडची अवस्था बिकट झाली असून चांगल्या दर्जाचे रोड मिळत नसल्याने टोल कशासाठी भरायचे असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित केला आहे. अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत मात्र फक्त टोल वसुलीकडे लक्ष दिले जात आहे.

रस्त्यांवरील खड्डे बुजवले जात नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. यासाठी आता माजी खासदार राजू शेट्टी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आता येणाऱ्या काळात याबाबत ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे देखील
त्यांनी सांगितले आहे. प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!