शेतातील कुंपणाच्या तारेला वीजेचा शॉक लागून एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू, जळगावमध्ये दुःखद घटना…


जळगाव : शेतात कोणी शिरु नये म्हणून मालकाने कुंपणात वीजेचा प्रवाह सोडला होता. या कुंपणाला स्पर्श झाल्यामुळे एकाच कुटुंबातील दोन महिला, पुरुष आणि लहान मुलांचा मृत्यू झाल्याची घटना जळगावमध्ये घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. एरंडोल तालुक्यात बुधवारी पहाटे शॉक लागून एका कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली.

एरंडोल तालुक्यातील वारखेडी गावात एका शेताभोवती तारेचे कुंपण घातले होते. यामध्ये ही घटना घडली आहे. पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. संपूर्ण घटनेचा पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे. गावातील एका शेतकऱ्याने आपल्या शेताचे पिके वन्यप्राण्यांपासून वाचवण्यासाठी शेताच्या भोवती लोखंडी तारांचे कुंपण घातले होते.

असे असताना मात्र याठिकाणी याच शेतकरी कुटूंबाचा शेवट झाला आहे. या विजेच्या प्रवाहाची कल्पना नसलेल्या मजुरांचा या कुंपणाशी संपर्क आला आणि त्यांना विजेचा धक्का बसला. घटनास्थळीच सर्वांचा मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच पहाटेच गावात मोठी खळबळ उडाली. याबाबत तपास सुरु आहे.

दरम्यान, घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून, जळगाव जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांना वन्यजीवांमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे शेतकरी संरक्षणासाठी विजेच्या तारा ओढण्याचा मार्ग अवलंबतात. असे असले तरी हे काम जोखमीचे आहे. नकळत अशाप्रकारच्या घटना घडत आहेत.

अशा घटनांमुळे मानवी जीवितहानी होत असल्याने गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. एरंडोल तालुक्यात बुधवारी पहाटे शॉक लागून एका कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. संपूर्ण घटनेचा पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!