अजित पवारांनी टवाळखोरांना भरला दम!! म्हणाले, दहशत खपवून घेणार नाही, लाईन मारायला गेला तर…


बारामती : कोणी कुठे तरी लाईन मारायला जाल. तुझी लाईनच काढतो आणि टायराखाली घेतो अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवारांनी रोड रोमियोंना आणि टवाळखोरांना सज्जड दम दिला आहे. बारामतीमध्ये ते बोलत होते.

कोणाची दहशत खपवून घेणार नाही, कुणालाही अजिबात सोडणार नाही असं ही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. त्यामुळे वेळीच शहाणे व्हा, कायदा हातात घेऊ नका. बाबासाहेबांनी संविधान आणि कायदा समाजाच्या भल्यासाठी दिला आहे असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

बारामतीतील कायदा आणि सुव्यवस्थेवरून अजित पवार यांनी कडक भूमिका घेतली आहे. बाहेरून आलेल्या लोकांकडून होणारे गुन्हे आणि टवाळक्या केल्याने बारामतीची बदनामी होत आहे. हे अजिबात खपवून घेतले जाणार नाही, असा सज्जड दम अजित पवार यांनी दिला आहे.

अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले, उत्तर प्रदेश आणि बिहार मधून कामासाठी लोक येतात. मात्र, एकाने आठ वर्षांच्या मुलीवर तीही उत्तर प्रदेशची असताना अत्याचार केला. शेवटी बदनामी बारामतीची होते. अशा गुन्हेगारांना अजिबात सोडू नका. त्यांचा पोलिसांनी कायमचा बंदोबस्त करावा.

तो कुठल्याही राजकीय पक्षाचा असला तरी गुंडगिरी खपवून घेवू नका. बारामतीती टवाळक्या करणाऱ्या तरुणांना अजित पवार यांनी सुनावले आहे. कुणी कुठेतरी लाइन मारायला गेला तर तुझी लाइनच काढतो आणि टायरखाली घेतो. कुणालाही सोडणार नाही. प्रत्येकाने कायदा हातात घेऊ नये, असा सज्जड दम अजित पवार यांनी भरला आहे. कायदा सुव्यवस्था सुरक्षित राहावी. त्यात कोणाची दादागिरी गुंडगिरी असता कामा नये, सर्वांनी शिस्तीचे पालन करावं असंही ते म्हणाले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!