तुळजाभवानी देवीच्या मुख्य गाभाऱ्याच्या पाहणीचा अहवाल राज्य पुरातत्त्व विभागाकडे ; शिखराबाबतचा निर्णय लांबणीवर ?


पुणे : महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या आई तुळजाभवानी देवी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यातील शिखराबाबत निर्णय प्रक्रियेस आता चांगलाच वेग आला आहे. केंद्रीय पुरातत्व विभागाने गाभाऱ्यातील शिळाना गेलेले तडे आणि सद्यस्थितीच्या केलेल्या पाहणीचा अहवाल राज्य पुरातत्त्व विभागाकडे सोपवला आहे. यानंतर आता मंदिराच्या मुख्य शिखराबाबतचा निर्णय कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिल आहे.

तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यातील शिळांना तडे गेल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आले होते. याबाबत केंद्रीय पुरातत्व विभागाकडून पाहणी करण्यात आली होती. यासंबंधीचा अहवाल विभागाकडून तयार करण्यात आला. त्यानंतर हा अहवाल आता राज्य पुरातत्व विभागाकडे सुपूर्द केला आहे.दरम्यान मंदिराच्या मुख्य शिखराबाबत अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. मात्र लवकरच पुरातत्व विभागाच्या बैठकीत सकारात्मक निर्णयाची जिल्हा प्रशासनाला अपेक्षा आहे. केंद्रीय पुरातत्व विभागाकडून देण्यात आलेल्या अहवालानंतर मुंबईत बैठक घेऊन तोडगा काढण्यासाठी राज्य पुरातत्त्व विभागाला जिल्हा प्रशासनाने साद घातली आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तुळजाभवानी देवीच्या मंदिराच्या शिखराला हात लावू न देण्याची भूमिका व्यक्त केल्यानंतर भाजप आणि आव्हाड समर्थकांमध्ये जोरदार वाद झाला. या वादानंतर आता जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे असून शिखरासंदर्भात लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!