मोठी बातमी! देवकुंड धबधब्यात बुडून दोघांचा मृत्यू! डॉक्टर बुडत असताना स्थानिक तरुण वाचवायला गेला अन्….

पुणे : गेल्या काही दिवसांपासून अनेक पर्यटन स्थळांवर वेगवेगळ्या धक्कादायक घटना घडत आहेत. यामुळे अनेक पर्यटन स्थळांवर बंदी देखील घालण्यात आली होती. हळूहळू ही बंदी उठवण्यात आली आहे. असे असताना एक धक्कादायक घटना देवकुंड धबधब्यावर घडली आहे.
याठिकाणी दोघांचा धबधब्यात बुडून मृत्यू झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सुबोध करंडे असं या डॉक्टरचं नाव आहे. सुबोध करंडे या बुडणाऱ्या डॉक्टरला वाचवण्यासाठी गेलेल्या स्थानिक तरुणाचा देखील बुडून मृत्यू झाला आहे. दिलीप वनघरे असं मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
सध्या स्थानिकांच्या मदतीने देवकुंडात रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. पुणे जिल्ह्यातील जिल्ह्यातील भिमाशंकरजवळील भिवेगाव देवकुंड धबधब्यात दुर्दैवी घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच याठिकाणी बचाव दल आणि स्थानिक लोकांनी धाव घेतली. मात्र त्यांचे जीव वाचले नाही.
याठिकाणी सहा डॉक्टरांची टीम फिरायला गेली होती. यावेळी एका डॉक्टरचा बुडून मृत्यू झाला आहे. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ही घटना घडली असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे पर्यटन स्थळांवर सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.