स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! विश्वासू नेत्यांनी सोडली साथ…

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेसला गळती लागल्याच चित्र आहे. या तिन्ही पक्षातून राजकीय नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात मोठ्या संख्येने प्रवेश करताना दिसतात.

याच पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेसला गळती लागल्याचे चित्र होते, पण आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेलाही सोलापूर जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे.
पक्षाला मोठे खिंडार पडले असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी हे चांगले संकेत नसल्याचे मानले जात आहे. मागील आठवड्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे आणि विश्वासू मानले जाणारे सोलापुरातील नेते शिवाजी सावंत यांनी शिंदे यांच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली.

दरम्यान, जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत यांच्या राजीनाम्यानंतर जिल्ह्यात राजीनामा सत्र सुरू झाले आहे. माढा तालुका प्रमुख मुन्ना साठे यांनी सांगितले की, संजय कोकाटे आणि पंढरपूरच्या महेश साठे या दोघांमुळे सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना फुटली. या दोघांच्या कुरघोडीमुळे आम्ही राजीनामे देत आहोत.
मुन्ना साठे म्हणाले की, मागील दोन महिन्यांपासून चुकीच्या लोकांना या दोघांनी पदे वाटल्यामुळे जिल्ह्यात आता ही सेनेची अवस्था झाली आहे. पक्षाच्या निरीक्षकांसह वरिष्ठांना देखील या मंडळींनी चुकीची माहिती दिल्यामुळे राजीनामा सत्र सुरू झाले आहे.