पिच्चरमध्ये काम देतो म्हणून मुलींना फसवलं, लोणावळा, साकीनाका परिसरात वेगळ्याच पार्ट्या, खेवलकरांच्या मोबाइलमध्ये….


पुणे : रेव्ह पार्टी प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या प्रांजल खेवलकर यांचे पाय आणखी खोलात जात असल्याचं चित्र आहे. खेवलकर याच्या मोबाइलमध्ये पोलिसांना अश्लील फोटो आढळले असल्याची माहिती समोर आली आहे.

त्याचबरोबर पार्ट्यांमध्ये महिलांना नशा करवून लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा गंभीर आरोप राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी काल (गुरुवारी) पत्रकार परिषदेत केला आहे.

दरम्यान, त्याचबरोबर महिलांना पिच्चरमध्ये काम देण्याचे आमिष दाखवून लोणावळा, साकीनाका परिसरात पार्ट्यांचे आयोजन करण्यात येत होते. आणखी काही गोष्टी तपासामध्ये उघड होत आहेत.

मानवी तस्करी विरोधी पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला असून अरूष नावाच्या एका व्यक्तीचा यातील सहभाग उघड होत असल्याची माहिती देखील रूपाली चाकणकरांनी दिली आहे, यामुळे आता पुन्हा एकदा एकनाथ खडसेंचे जावई आणि रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ होणार असल्याची चर्चा आहे.

काही महिलांशी चॅटिंगही केल्याचंही समोर आलं आहे. पीडितांमध्ये मोलकरणींचाही समावेश आहे, अशी माहिती चाकणकरांनी दिली. या प्रकरणाचे गंभीर स्वरूप लक्षात घेता, विशेष तपास पथकाने (एसआयटी) तपास करावा व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राज्य महिला आयोगाने केली आहे. चाकणकरांनी माहिती देताना सांगितले की, खेवलकर याने एकूण २८ वेळा त्या हॉटेलमध्ये खोली बुक केली असल्याची तक्रार आयोगाकडे आली होती. त्याची दखल घेत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना प्रकरणाच्या तपासाबाबत आयोगाने पत्र दिले आहे.

खेवलकरच्या मोबाइलमध्ये हिडन फोल्डरमध्ये एकूण १७४९ नग्न फोटो आणि व्हिडीओ असून, त्यामध्ये २३४ फोटो आणि २९ व्हिडीओ अत्यंत अश्लील आहेत. ही फोटो आणि व्हिडीओ पीडित महिलांना ब्लॅकमेल करण्यासाठी वापरण्यात आले असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. महिलांना सिनेमात काम देण्याचे आमिष दाखवून लोणावळा, साकीनाका परिसरात ते पार्ट्यांचे आयोजन करण्यात येत होते. आणखी काही गोष्टी तपासामध्ये उघड होत आहेत.

 

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!