आई वडिलांनी नवीन मोबाईल घेतला नाही म्हणून 16 वर्षीय मुलाने केली आत्महत्या, घटनेने सगळेच हादरले…

छत्रपती संभाजीनगर : येथील शहरा जवळील खवड्या डोंगरावरून तरुणांना उडी घेत आपले आयुष्य संपवले आहे. या घटनेने सगळेच हादरले आहेत. आईने मोबाईल का दिला नाही ? या कारणावरून अवघ्या 16 वर्षांच्या मुलाने थेट डोंगरावरून उडी मारत आपला आयुष्य संपवले आहे. या घटनेमुळे मोबाईलचा किती अतिरेक झाला आहे हे लक्षात येईल.

हा मुलगा आपल्या आई- वडिलांसोबत संभाजीनगरच्या वाळूज परिसरात राहत होता. तो सध्या पोलीस भरतीसाठी तयारी करत होता. काही दिवसांपूर्वी त्याने आई-वडिलांकडे मोबाईलची मागणी केली होती. असे असताना आईने विरोध करत मोबाईल आताच नको असे सांगितले. याचा या मुलाला राग आला. याच रागातून त्याने हे कृत्य केले आहे.
यामुळे तो नाराज झाला होता. आईने मोबाईल न दिल्याच्या रागात त्याने थेट खवडया डोंगर गाठला आणि उंचावरून उडी घेतली. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पुढील तपास सुरू आहे. त्याची बॉडी बाहेर काढण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अशाच कारणांमुळे घडलेल्या आत्महत्यांच्या घटना वारंवार समोर येत असल्याने पालकांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. अगदी लहान मुले देखील अशा प्रकारे टोकाचे निर्णय घेत आहेत. यामुळे परिस्थिती भयंकर आहे. यामुळे पालकांनी सावध असणे आवश्यक आहे.

पालकांनी आपल्या मुलांना समजून घेणं गरजेचं आहे. त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी बोलल्यानंतर या गोष्टी समजून सांगणे आवश्यक आहे. मुलांमध्ये आलेली अस्थिरता, निर्णय घेण्याची घाई आणि तात्कालिक रागाचे परिणाम खूप गंभीर होऊ शकतात. पालकांनी संवाद वाढवावा, जेणेकरून अशा गोष्टी घडणार नाहीत.