बीडमध्ये पंकजा मुंडेंना धक्का ; कट्टर समर्थक 35 वर्षाची साथ सोडून अजित पवारांसोबत जाणार, चर्चांना उधाण


बीड : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका तोंडावर असताना बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या 35 वर्षापासून दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि त्यांच्या पश्चात पंकजा मुंडे यांच्यासोबत असलेले जेष्ठ नेते राजाभाऊ मुंडे आणि त्यांचे चिरंजीव बाबरी मुंडे यांनी त्याची साथ सोडण्याचा निर्णय घेतला असून ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना अधिक उधाण आलं आहे.

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक राजाभाऊ मुंडे आणि त्यांचे चिरंजीव बाबरी मुंडे यांचा मोठा प्रवेश सोहळा होणार आहे. येत्या 7 तारखेला खुद्द अजित पवार यांच्या हस्ते सोहळा पार पडणार आहे. या निर्णयामुळे पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसणार आहे. आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन हा पक्षप्रवेश निश्चित करण्यात आला आहे.त्यामुळे बीड जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बीड जिल्ह्याच्या वडवणी येथे बाबरी मुंडे आणि त्यांचे वडील राजाभाऊ मुंडे यांचे मोठे वर्चस्व आहे. अशा परिस्थितीत पंकजा मुंडे यांची साथ सोडत आता हे पिता पुत्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादांकडे प्रवेश करणार असल्याने आता राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलेच उधाण आल्याचे देखील पाहवयास मिळत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!