कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महाराष्ट्रातील ‘या’ कर्मचाऱ्यांना मिळणार जुनी पेन्शन योजनेचा लाभ, जाणून घ्या..


पुणे : महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने अखिल भारतीय सेवेतील काही अधिकार्‍यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला असून याबाबतचा अधिकृत शासन निर्णय 29 जुलै 2025 रोजी सामान्य प्रशासन विभागाने जारी केला आहे.

केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार घेतलेला हा निर्णय संबंधित कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. केंद्र सरकारने 9 मे 2025 रोजी कार्मिक आणि प्रशिक्षण विभागामार्फत एक पत्र जारी करून एक महत्त्वाची अट अधोरेखित केली होती – ज्या अधिकाऱ्यांचा सेवेदरम्यान मृत्यू होतो किंवा गंभीर अपंगत्वामुळे ते सेवेस अपात्र ठरतात, अशा प्रकरणांमध्ये त्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ दिला जाईल.

या पत्रानुसार केंद्र शासनाच्या कार्मिक, लोक तक्रारी व निवृत्तीवेतन मंत्रालय, कार्मिक व प्रशिक्षण विभाग, नवी दिल्ली या विभागातील महाराष्ट्रातील अ.भा.से. अधिकाऱ्यांचा सेवेदरम्यान मृत्यू झाल्यास किंवा त्यांना अपंगत्व आल्यास (अपंगत्वामुळे थेट सेवेसाठी अपात्र ठरल्यास) अशा प्रकरणांमध्ये जर त्यांना नवीन पेन्शन योजना लागू असेल तर जुनी पेन्शन योजनेचा सुद्धा विकल्प दिला जाणार आहे.

अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा सेवेदरम्यान मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्वामुळे सेवेस अपात्र ठरल्यास राष्ट्रीय पेन्शन योजनेंतर्गत समाविष्ट असलेल्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेंतर्गत लाभ मिळविण्याचा विकल्प देण्याच्या अनुषंगानेच 9 मे 2025 रोजी सामान्य प्रशासन विभागाकडे पत्र पाठवण्यात आले होते.

जुनी पेन्शन योजना ही अनेक सरकारी कर्मचाऱ्यांसाठी भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची बाब आहे. गेल्या काही वर्षांपासून यासाठी देशभरात मोठ्या प्रमाणावर आंदोलने झाली. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारांनी यावर सकारात्मक विचार करत काही विशेष परिस्थितींमध्ये जुनी योजना पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!