महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! १ ऑगस्टपासून पीक कर्जाच्या नियमात होणार हा मोठा बदल…


पुणे : शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘अ‍ॅग्रीस्टॅक’ योजनेअंतर्गत, १ ऑगस्टपासून महाराष्ट्रात पीककर्ज वाटपाची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन केली जाणार आहे.

दरम्यान, या महत्त्वपूर्ण बदलामुळे शेतकऱ्यांना आता बँकांचे चकरा मारण्याची, कागदपत्रांची धावपळ करण्याची आणि तांत्रिक अडचणींचा सामना करण्याची गरज भासणार नाही, ज्यामुळे त्यांचे श्रम आणि वेळ वाचणार आहे.

देशभरात सुरू असलेल्या अ‍ॅग्रीस्टॅक योजनेत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर असून, यामध्ये आतापर्यंत 1 कोटी 10 लाख 87 हजार 994 शेतकऱ्यांचे ‘फार्मर आयडी’ तयार करण्यात आले आहेत. या शेतकऱ्यांच्या सर्व माहितीचा डिजिटल डेटाबेस तयार झाला असून, यामध्ये जमीनधारणा, पीक माहिती, मृदास्वास्थ्य, हवामान व सरकारी योजनांचे लाभ यांचा समावेश आहे.

मागील आठवड्यात केंद्रीय वित्त, कृषी आणि सहकार विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राज्यातील विविध अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन ‘अ‍ॅग्रीस्टॅक डेटावर आधारित पीककर्ज वाटप’ करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे प्रायोगिक तत्त्वावर सुरू झालेली योजना आता थेट प्रत्यक्षात अंमलात येणार आहे. १ ऑगस्टपासून ही सुविधा सुरू होणार असून, पुढील रब्बी व खरीप हंगामासाठी ऑनलाईन कर्जप्रक्रिया हीच मुख्य प्रणाली होणार आहे.

या नवीन प्रणालीमुळे शेतकऱ्यांची अनेक वर्षांची अडचण दूर होणार आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यासाठी अनेक वेळा ७/१२ उतारे, उत्पन्न प्रमाणपत्रे, रहिवासी दाखले, बँक खाते तपशील आणि पीक पद्धती यासाठी अनेक ठिकाणी फेरफटका मारावा लागत होता.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!