बारामतीत झालेल्या अपघातात तिघा जणांनंतर आता ओंकारच्या वडिलांचाही मृत्यू, २४ तासात एकाच घरात चार जण देवाघरी, घटनेने हळहळ..


बारामती : बारामतीतील महात्मा फुले चौकात काल साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकी डंपर खाली गेल्याने दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला तर दोन चिमुकल्या मुली गंभीर जखमी झाल्या, त्यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

काल सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी डंपरच्या चाकाखाली दुचाकी सापडल्याने तिघेही चेंगरले गेले. यात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. ओंकार आचार्य असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दिवसाची चालकाचे नाव आहे.

तसेच बारामतीच्या रस्त्यावरील भयानक वेगाने काल एका निष्पाप कुटुंबातील तिघाजणांचे बळी घेतल्यानंतर ओंकार आचार्यच्या वडिलांचेही आज पहाटे निधन झाले. राजेंद्र श्रीनिवास आचार्य हे निवृत्त शिक्षक होते.

काल बारामतीच नाही, तर संपूर्ण जिल्हा हादरवून सोडणारी घटना बारामतीत घडली. कोणाच्याही अध्यात मध्यात नसलेले आचार्य कुटुंब संपले. काल दिवसभर बारामती सुन्न होती. संध्याकाळच्या साडेसात वाजता च्या वेळी ओंकार आणि त्यांच्या दोन्ही मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि आज पहाटे ओंकार चे वडील राजेंद्र श्रीनिवास आचार्य यांचे निधन झाले.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राजेंद्र आचार्य हे आजारी होते. बारामतीतील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना अपघाताच्या घटनेच्या आधी म्हणजे शनिवारी रात्री डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यांची प्रकृती तशी नाजूक होती, मात्र कालच्या घटनेने प्रचंड धक्का बसलेल्या राजेंद्र आचार्य यांनी आज शेवटचा श्वास घेतला. आज पहाटे त्यांनीदेखील इहलोकीची यात्रा संपवली.

काल ओंकार आणि त्याची मुलगी सई व माधुरी यांचा बळी घेणारा हायवा डंपरच्या चालक दशरथ होता. पुराणकाळात देखील दशरथाला श्रावणबाळाच्या आई वडिलांनी शाप दिला होता. सध्याही हिंदुत्वाचे युग आहे. प्रत्येकाच्या तोंडी रामायण महाभारत आहे.. काल देखील बारामतीत कलियुगाच्या दशरथाने आपल्या श्रावणबाळाचे प्राण घेतले हा विरह सहन न झाल्याने त्या बापाने देखील प्राण सोडला.. या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!