बिहार विधानसभा निवडणुकीचा पहिला सर्व्हे समोर, मोदींना धक्का, तेजस्वी यादव -राहुल गांधींची जोडी करणार सत्ता काबीज?

सध्या बिहार विधानसभा निवडणुकीची जोरदार चर्चा सुरु आहे. याठिकाणी येणाऱ्या काही महिन्यात निवडणूक लागणार आहे. यामुळे सगळेच पक्ष जोरदार तयारी करत आहेत. असे असताना एक आश्चर्यकारक सर्व्हे समोर आला आहे. वोट वाइबचे सह संस्थापक अमिताभ तिवारी यांच्या सर्व्हे नुसार बिहारमध्ये महागठबंधन एनडीएच्या थोडंस पुढं दिसत आहे.

यामुळे याठिकाणी जोरदार टक्कर होईल, असे सांगितले जात आहे. यामध्ये 36 टक्के लोकांचा विश्वास इंडिया आघाडीवर आहे. तर, 35 टक्के लोकांचा विश्वास एनडीएवर आहे. बिहारमध्ये विजय मिळवणं कोणत्याही आघाडीसाठी सोपं दिसून येत नाही. प्रशांत किशोर यांच्या जनसुराजला 10 टक्के लोक पर्याय मानत आहेत.
यामुळे याठिकाणी सगळ्यांनी आतापासूनच तयारी सुरु केली आहे. दोन्ही आघाड्यांचे मतदार निश्चित आहेत. महागठबंधनकडे मुस्लिम यादव मतदार आहे. तर एनडीएकडे EBC, महादलित, उच्च जात समुहातील मतदार आहेत. याठिकाणी गेल्या काही दिवसांमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. सध्या सर्वेनुसार सरकर विरोधात 48 टक्के लोकांमध्ये नाराजी आहे.

तसेच 54 टक्के लोकांना त्यांचा आमदार बदलायचा आहे. नाराजीचा फायदा महागठबंधन आणि जन सुराज यांच्यात विभागला जाण्याची शक्यता आहे. जनतेतील मोठ्या समुहाला वाटतं प्रशांत किशोर दोन्ही आघाडींची मत कमी करु शकतात. मुख्यमंत्री नितीशकुमार यांचं सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये कमी सक्रीय असणं एनडीएचं नुकसान करु शकतं.

तेजस्वी यादव मुख्यमंत्री पदाची पहिली पसंत आहेत. मात्र, त्यांचं निवडणूक अभियान अजूनही आक्रमक दिसून येत नाही. यामुळं विरोधी पक्षांना नुकसान होण्याची शक्यता असल्याचे म्हटले. उच्च जातीमधील लोक देखील त्रस्त आहेत. प्रसांत किशोर याबाबत बोलताना यशवंत देशमुख एनडीए आणि महागठबंधनला नुकसान पोहोचवू शकतात सांगितले आहे.