अमेरिकेतील शाळेतील गोळीबारात दोन विद्यार्थी ठार; तीन जण जखमी…!

वाॅशिंग्टन : अमेरिकेतील शाळेत गोळीबाराचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. आयोवा येथील डेस मोइनेस येथील शाळेत झालेल्या गोळीबारात दोन विद्यार्थी ठार झाले आणि एक शिक्षक जखमी झाला. पोलिसांनी अनेक संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
जखमी विद्यार्थ्यांचा मृत्यू
अमेरिकन मीडियानुसार, डेस मोइन्स आयोवा चार्टर स्कूलमध्ये सोमवारी दुपारी गोळीबाराची घटना घडली. गोळीबारात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेत तीन जण जखमी झाले असून एकावर उपचार सुरू आहेत. तिसरी व्यक्ती ज्याला गोळ्या लागल्या आहेत, तो शाळेतील शिक्षक असून त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. मात्र, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी अद्याप गोळी झाडणाऱ्या आरोपींची नावे जाहीर केलेली नाहीत.
दोघांना ताब्यात घेण्यात आले
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गोळीबारानंतर लगेचच घटनास्थळापासून सुमारे दोन मैल अंतरावर तीन जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून कारही जप्त करण्यात आली आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप आरोपींची नावे जाहीर केलेली नाहीत.