भारतीय खेळाडूंनी घेतला मोठा निर्णय!! भारत-पाकिस्तान सामना रद्द, नेमकं कारण काय?

भारत-पाकिस्तान यांच्यातील सध्या सुरु असलेल्या तणावामुळे एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स (WCL) 2025 मधील हाय-व्होल्टेज सामना रद्द झाला आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. हा सामना 20 जुलै 2025 रोजी एजबेस्टन स्टेडियमवर होणार होता.
याबाबत माहिती अशी की, पाच भारतीय खेळाडूंनी सामना खेळण्यास नकार दिल्याने तो रद्द करण्यात आला. यामध्ये सुरेश रैना, हरभजन सिंग, इरफान पठाण, युसूफ पठाण आणि शिखर धवन यांचा समावेश आहे. सध्या दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पाकिस्तानी चाहत्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. पाकिस्तानला यामुळे मोठा धक्का बसला आहे. भारतीय चाहत्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. संघात निवड झालेल्या सुरेश रैना आणि शिखर धवन या खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्ध खेळणार नसल्याचे आधीच स्पष्ट केले होते.
पाकिस्तानविरुद्ध न खेळण्याचा निर्णय ११ मे रोजी आयोजकांना कळवण्यात आला होता. पाकिस्तानविरुद्ध न खेळण्याचा निर्णय सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीचा विचार करून घेण्यात आला आहे, असेही त्याने म्हटले होते. एजबेस्टन स्टेडियम प्रशासनाने प्रेक्षकांना सामना रद्द झाल्याने स्टेडियमवर न येण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स स्पर्धा १८ जुलै ते २ ऑगस्ट २०२५ ला होणार आहे. ही स्पर्धा इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) आयोजित केली आहे. या स्पर्धेतील सामने बर्मिंगहॅम, नॉर्थम्टन, लेस्टर आणि लीड्स येथे आयोजित करण्यात आले आहेत.