मोठी बातमी! लाडकी बहीण योजना अखेर रद्द, नोंदणीसाठी आलेले २७ हजार अर्ज रद्द…


मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते. पण यादरम्यान बोगस लाभार्थ्यांनी योजनेत सहभागी होत पैसा लाटल्याचा आरोप झाल्यानंतर शासनाने अशा महिलांचा शोध सुरू केला.

यादरम्यान जिल्ह्यातील सुमारे २६ हजार ९२७महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडून दिला. दरम्यान आता या योजनेची नोंदणीही बंद झाली आहे. नोंदणी बंद होऊन नऊ महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे. यादरम्यान काही महिला वंचित आहेत.

२७ हजार महिलांचे अर्ज रद्द…

जिल्ह्यात आतापर्यंत २६ हजार ९२७महिलांनी अर्ज रद्द झाले आहेत. ‘लाडकी बहीण’चा लाभ देण्यात येत नाही. येत्या काळात लाभ सोडणाऱ्या महिलांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

३.३७ लाख महिला लाभार्थी…

गोंदिया जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचे ३ लाख ३७ हजार ५०७लाभार्थी आहेत. सध्या १ हजार ५०० रुपयांचा लाभ घेत आहेत. आगामी हप्त्यानंतर ही संख्या कमी होण्याची शक्यता आहे.

आधार लिंकवरून लाभाची पडताळणी होणार…

‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभघेण्यासाठी संबंधित महिलेचा आधार क्रमांक बैंक खात्याशी संलग्न असणे आवश्यक आहे. तेव्हाच अनुदानाची रक्कम मिळते. माध्यमातून जिल्ह्यातील ‘नमो शेतकरी सन्मान योजने’त सहभागी महिलांचा शोध घेतला जातो आहे.

…तर होऊ शकतो अर्ज बाद

कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न २.५० लाख रुपयांपेक्षा अधिक किंवा कुटुंबात आयकरदाता सदस्य असेल, तर कुटुंबातील सदस्य नियमित, कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग अथवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत असेल तर अर्ज बाद होईल. इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या १,५०० पेक्षा जास्त रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतल्याचे आढळल्यास. कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या विविध उपक्रमांपैकी एखाद्या उपक्रमात संचालक अथवा सदस्य असेल, तर कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल तरीही त्या महिलेचा अर्ज बाद ठरू शकतो. कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) असेल तर अर्ज रद्द केला जाईल.

आयकर भरणाऱ्या महिलांना वगळणार…

गोंदिया जिल्ह्यातील ३ लाख ३७ हजार ५०७ महिलांना मार्च महिन्याचा हप्ता मिळाला. ‘डीबीटी’द्वारे थेट बँक खात्यात हे अनुदान जमा करण्यात आले; परंतु एप्रिल महिन्याचा हप्ता मात्र मिळालेला नाही. ज्या महिलांच्या कुटुंबात कार असेल, अशा महिलांची नावे योजनेतून वगळली जाणार असल्याने लाभार्थी महिलांची संख्या घटणार आहे. ‘आयटीआर’ भरणाऱ्यांनीही फॉर्म भरलेले होते. त्यांचीही नावे वगळली जाणार आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!