२०२५ मध्ये युद्ध तर २०३३ मध्ये..!! बाबा वेंगा यांचं हादरून सोडणारं भाकीत, नेमकं काय म्हणाले?


नवी दिल्ली : जेव्हा -जेव्हा जगप्रसिद्ध भविष्यवेत्त्यांची चर्चा होते. त्यामध्ये बाबा वेंगा यांचं नाव आघाडीवर असतं, बाबा वेंगा यांचा जन्म बल्गेरियामध्ये 1911 साली झाला होता. तर मृत्यू 1996 साली झाला. त्यांनी आपल्या हयातीमध्ये अनेक मोठे भाकीतं केली, त्यातील काही भाकीतं खरी ठरल्याचा दावा बाबा वेंगा यांच्या समर्थकांकडून करण्यात येतो.

बाबा वेंगा यांच्यासंदर्भात असा देखील दावा केला जातो की, एका वादळात सापडल्यामुळे त्यांनी आपल्या दोन्ही डोळ्याची दृष्टी गमावली. त्यानंतर त्यांना दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली. बाबा वेंगा यांनी आपल्या आयुष्यात अनेक मोठी भाकीत केली आहे. दरम्यान आता त्यांचं आणखी एक मोठं भाकीत समोर आलं आहे.

बाबा वेंगांच्या भाकितांमध्ये आणखी एक धक्कादायक इशारा आहे, 2025 मध्ये युरोपमध्ये एक महायुद्ध होईल. हे युद्ध मानवतेच्या नाशाची सुरुवात ठरेल. त्यानंतर जागतिक तापमान, प्रदूषण आणि पर्यावरणावर त्याचा गंभीर परिणाम होईल. या युद्धामुळे मानवी जीवनाला केवळ राजकीयच नव्हे तर निसर्गाच्या स्तरावरही मोठ्या संकटांना सामोरे जावे लागेल.

बाबा वेंगांनी 2033 सालासाठी एक अत्यंत भयावह इशारा दिला आहे. त्यांच्या मते, त्या वर्षी ध्रुवीय भागातील बर्फ वेगाने वितळू लागेल. त्यामुळे समुद्राची पातळी वाढेल आणि किनारपट्टीलगतची अनेक घरे, शहरे आणि जीवनशैली पूर्णपणे उद्ध्वस्त होईल. लाखो लोक या पुरामध्ये बेघर होतील. या इशाऱ्याचं गांभीर्य लक्षात घेता, शास्त्रज्ञ आणि हवामान तज्ज्ञ देखील याबाबत अधिक सजग राहण्याची गरज असल्याचं सांगतात.

फक्त पूर किंवा किनाऱ्यावरील शहरेच नव्हे, तर या बदलामुळे पृथ्वीचं पर्यावरणीय संतुलनही ढासळेल. हवामान इतकं अस्थिर होईल की जे आज आपल्याला ऋतू बदल वाटतात, ते उद्या एखाद्या संकटाच्या रूपात उभे राहतील. वाढत्या तापमानामुळे जमिनीवरची वनस्पती आणि प्राणीजीवनही धोक्यात येईल.

काही शहरे कायमची पाण्याखाली जातील आणि स्थलांतर करणाऱ्या लोकांची संख्या लाखोंच्या वर जाईल. हा सारा विनाश फक्त निसर्गाचा कोप नसून, माणसाच्या अति प्रगतीची आणि हवामान बदलाकडे केलेल्या दुर्लक्षाची किंमत असेल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!