आता शीव, पाणंद, रस्त्यांची गावदप्तरी व सातबारा उताऱ्यावर नोंद होणार!! डॉ. सुहास दिवसे समितीची राज्य सरकारकडे प्रस्ताव, अनेक वाद मिटणार…


पुणे : जमाबंदी आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. यामध्ये गाव नकाशात असलेल्या तसेच गावोगावी शासकीय वा खासगी प्रयोजनांकरिता वापरात असलेल्या शीव, पाणंद व रस्त्यांना आता कायदेशीर दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे अनेकांचा फायदा होणार असून वाद टळणार आहेत.

या रस्त्यांची नोंद गावदप्तरी व सातबारा उताऱ्यावर घेण्याची शिफारस राज्य सरकारकडे केली आहे. याबाबत डॉ. दिवसे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने राज्य शासनाला अहवाल सादर केला आहे. यामध्ये गावपातळीवर विशेष मोहीम राबवून रस्त्यांची नोंदणी करण्याची सूचना करण्यात आली आहे.

राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार गाव नकाशा, रस्ते आणि मालमत्तेच्या हक्कांबाबत स्पष्ट धोरण तयार करण्यासाठी एक सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. सध्या अनेक पाणंद, शीव, वहिवाटीचे रस्ते किंवा शासकीय कारणासाठी बांधले गेलेले रस्ते सातबारा उताऱ्यावर नोंदलेले नाहीत. याबाबत तक्रारी, अतिक्रमण आहे.

या रस्त्यांची नोंद सातबाऱ्यावर घेतल्यास त्यांना कायदेशीर स्वरूप प्राप्त होईल. यामुळे याबाबत अभ्यास केला गेला आहे. राज्य सरकार यावर लवकरच अंतिम निर्णय घेणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत सरकार देखील प्रयत्नशील आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!