प्रेयसीला भेटायला गेला प्रियकर अन् तरुणीने कापला त्याचा प्रायव्हेट पार्ट, हादरवणारे कारण आलं समोर…

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील संत कबीर नगर जिल्ह्यातील मेहदावल परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका प्रेयसीने आपल्या प्रियकराला घरी बोलावून ब्लेडने त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला. त्यात तो गंभीर जखमी झाला. तो रक्तबंबाळ झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
ही घटना समजल्यानंतर प्रियकराच्या कुटुंबीयांनी त्याला रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात आणले. रुग्णालय प्रशासनाने खलीलाबाद कोतवाली पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. त्या तरुणावर उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला डिस्चार्ज दिला. पण त्या तरुणीने असं का केलं असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, खलीलाबाद कोतवाली परिसरात राहणाऱ्या २० वर्षीय तरुणाचे मेहदावल परिसरातील एका गावातील समवयस्क मुलीशी प्रेमसंबंध होते. गेल्या दोन वर्षांपासून ते दोघे रिलेशनशिपमध्ये होते. दोघे ही एकमेकांच्या संपर्कात होते.
ते सतत एकमेकांबरोबर फोनवर बोलत होते.हा प्रियकर तीन भावांमध्ये सर्वात लहान होता. त्याचे वडील आणि दोन्ही भाऊ रोजगारा निमित्त बाहेरगावी गेले होते. त्याच वेळी मंगळवारी प्रेयसीने फोन करून प्रियकर तरुणाला भेटण्यासाठी आपल्या घरी बोलावले होते.
याच दरम्यान, प्रेयसीने प्रियकराच्या प्रायव्हेट पार्टवर वार करून त्याला जखमी केले. गेल्या दोन वर्षांपासून दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनाही होती. त्यांचे कुटुंबीय लग्नासाठीही तयार झाले होते. या घटनेबाबत अद्याप पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.
एएसपीने सांगितले की, कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना निदर्शनास आली आहे. या प्रकरणी अद्याप कुटुंबीयांकडून कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही. तक्रार मिळाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. पण त्या तरुणीने असं का केलं हे मात्र अजून ही गुलदस्त्यात आहे.