दौंड तालुक्यात धक्कादायक घटना! शेतमजूर महिलेचा विनयभंग, जातीवाचक शिवीगाळप्रकरणी गुन्हा दाखल…

दौंड : दौंड तालुक्यातील राहू परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी शेतमजूर पती कामावर न गेल्याच्या रागातून त्याच्या पत्नीचा हात पकडून विनयभंग करत जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. यामुळे पोलीस याबाबत तपास करत आहेत.
दरम्यान, पीडित महिला आणि तिचा पती हे दोघेही शेतमजुरी करत होते. पती काही कारणास्तव आरोपीकडे कामावर गेला नव्हता. याच कारणाने आरोपी चंद्रकांत दत्तात्रेय तापकीर यांनी महिलेचा हात पकडून तिचा विनयभंग केला आणि तिच्या जातीविषयी आक्षेपार्ह व अपमानास्पद शब्द वापरले. यामुळे प्रकरण वाढले आहे.
तसेच पीडित महिलेच्या पतीने यापूर्वी आरोपीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. यामुळे आरोपीने महिलेवर शारीरिक आणि मानसिक अत्याचार केले. यावेळी तिच्या पतीलाही जातीवाचक शब्द वापरले. यवत पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानातील विनयभंगाशी संबंधित कलमे आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत तपास दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस हे करत आहेत. या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात एका शेतकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. सध्या