केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे शिंदवणे घाट ते आंबळे मार्गाच्या कामाचे ट्विट! खडतर मार्गाचे काम पूर्ण झाल्याबद्दल अभियांत्रिकी कामाचे केले कौतुक…


उरुळीकांचन : मध्य रेल्वेने पुणे -सांगली रेल्वे मार्गावरील शिंदवणे ते आंबळे घाट दरम्यानच्या दुहेरी मार्गाचे डबलिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल खुद्द केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विटद्वारे यांनी ही माहिती दिली आहे.

महत्वपूर्ण प्रकल्प असलेल्या पुणे-मिरज दुहेरीकरणाचे काम मध्य रेल्वेने पूर्ण केले आहे. या प्रकल्पात जोडणाऱ्या शिंदवणे घाट ते आंबळे दरम्यान जोडणाऱ्या मार्गला रेल्वे ब्रीज उभारुन बोगद्यामार्गे स्वतंत्र मार्ग पूर्ण केला आहे. ९.४५ कि.मी लांबीचा भाग त्याच्या कठीण भूप्रदेशामुळे आणि जटिल अभियांत्रिकी आवश्यकतांमुळे संपूर्ण कॉरिडॉरमधील सर्वात आव्हानात्मक विभाग मानला जात होता.मात्र तो पूल व बोगादा मार्गाने पूर्ण झाला आहे.

दरम्यान पुणे-सातारा या महत्त्वाच्या विभागाचे दुहेरीकरणाचे काम आता पूर्ण झाले आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी पाहणी केल्यानंतर १७ जून रोजी शिंदवणे-आंबळे विभाग उघडण्यात आला. या विभागाच्या पूर्णतेसह, पुणे-मिरज दुहेरीकरण प्रकल्पाच्या २७९ किमी पैकी एकूण २५८ किमी आता कार्यान्वित झाले आहे.

तसेच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आळंदी म्हातोबा हे स्थानक टर्मिनल उभारण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैश्णव यांनी या प्रकल्पातील शिंदवणे व आंबळे मार्गाचा उल्लेख केल्याने या प्रकल्पाची भव्यता स्थानिकांना माहिती नसताना केंद्रीय मंत्र्यांनी केलेल्या ट्विटचे मोठे कुतूहल व्यक्त होत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!