महाराष्ट्रातील शाळा, अंगणवाडी, रस्ते, पुलाकडे लक्ष द्या, क्रिकेटचे मैदान पुढील वर्षी बांधा, सुप्रिया सुळे यांची सरकारकडे विनंती..


पुणे : शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सध्या सरकारकडे एक विनंती केली आहे. महाराष्ट्र सरकार एक लाख प्रेक्षक क्षमता असलेले क्रिकेट मैदान बांधत असल्याचे समजले. ही आनंदाची बाब आहे. आम्ही त्याचे स्वागत करतो. परंतु त्याचवेळी महाराष्ट्रातील शाळा, अंगणवाडी, पुल, रस्ते यांची अवस्था अतिशय खराब आहे.

याकडे देखील आपण लक्ष दिले पाहिजे. कालच मावळ तालुक्यातील पुल कोसळून मोठी दुर्घटना घडली. राज्यातील अनेक ठिकाणी शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे, अंगणवाड्या यांच्या इमारती दुरुस्त करणे गरजेचे आहे. राज्यातील क्रीडासंस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी इतरही काही उपाययोजना करता येऊ शकतील.

शासनाने शाळांची मैदाने ठिकठाक करावी, तेथे क्रीडासाहित्य उपलब्ध करून द्यावे. राज्यात आजमितीला दर्जेदार अशी क्रिकेटची मैदाने आहेत. तेथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने खेळले जातात. हे सर्व समोर असताना नवीन मैदान बांधण्याची घाई कशासाठी? मैदान पुढील वर्षी देखील बांधता येऊ शकते. असेहो त्या म्हणाल्या.

तसेच त्या म्हणाल्या, माझी सरकारला विनंती आहे की महाराष्ट्रातील शाळा आणि अंगणवाडी, रस्ते, पुल याच्या सुरक्षिततेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मैदानाला विरोध नाही, पण आपले प्राधान्य कोणत्या गोष्टीला असावे याचे चिंतन करणे गरजेचे आहे. असेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे. मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून मोठी दुर्घटना झाली.

सुप्रिया सुळे यांनी येथे तातडीने भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. याप्रसंगी तेथील नागरीकांशी संवाद साधला. या दुर्घटनेतील पिडीतांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. या भीषण घटनेत काही नागरीकांचा मृत्यू झाला. तर काहीजण वाहून गेले असून मदत आणि बचावकार्य सुरु आहे. जखमी नागरीकांवर उपचार सुरु आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!