दादा परत आठवा! बच्चू कडू यांनी थेट पुरावाच दिला, विधानसभेआधी दादांनी दिलेला कर्जमाफीचा शब्द, आता नेमकं काय गंडलं?


अमरावती : गेल्या काही दिवसांपासून राज्यात शेतकरी कर्जमाफी वरून राजकीय वातावरण तापले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी बाबत शब्द दिला होता. मात्र विधानसभा निवडणूक संपतात महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आपण शब्द दिला नसल्याचे अनेकदा म्हटले आहे.

असे असताना प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू हे गेल्या काही दिवसांपासून शेतकरी कर्जमाफी यासह इतर अनेक मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन करत आहेत. असे असताना बच्चू कडू यांनी अजित पवार यांनी कर्जमाफी बाबत विधानसभा निवडणुकीपूर्वी केलेली पोस्ट शेअर केली आहे. यावेळी बच्चू कडू यांनी दादा परत आठवा असे कॅप्शन लिहिले आहे.

यामुळे बच्चू कडू यांनी थेट अजित दादांनी कर्जमाफी बाबत दिलेला शब्द सर्वांसमोर आणला आहे. यामुळे अजित दादा कर्जमाफीमुळे बॅकफूटवर गेले आहेत. याबाबत बच्चू कडू यांचे आंदोलन सुरूच असून काल चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्र्यांशी त्यांची चर्चा करून दिली. यावेळी एक समिती करून आपण निर्णय घेऊ असे आश्वासन त्यांना दिले आहे.

असे असताना मात्र बच्चू कडू आंदोलनावर ठाम असून आज ते काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत बच्चू कडू यांना अनेक आमदार खासदार तसेच शेतकरी संघटनांचा पाठिंबा वाढत आहे. यामुळे सरकारवर दबाव वाढत असून आता कर्जमाफीची घोषणा होणार का याकडे संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, प्रहार जनशक्ती या पक्षाचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे समाधीस्थळ गुरुकुंज आश्रम, मोझरी येथे शेतकरी, कष्टकरी, दिव्यांग, तरुण, निराधार आदींच्या न्याय्य हक्कांसाठी बेमुदत अन्नत्याग आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून ते मांडत असणारे विविध प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत. शासनाने ते प्राधान्याने सोडविलेच पाहिजेत अशी भूमिका अनेकांनी घेतली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!