अखेर महाराष्ट्रात नवीन तालुक्यांची निर्मिती होणार, देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती, नावे आणि संख्याही ठरली?

पुणे : नवीन तालुका निर्मिती बाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे एक विधान चर्चेत आले आहे. म्हणून जिल्हा निर्मिती बाबत नाही तर तालुका निर्मिती बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक असल्याचे दिसत आहे. महत्त्वाचे म्हणजे तालुका निर्मितीचे काम लवकरच पूर्ण होण्याचे संकेतही आता मिळत आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही आपणास सांगू इच्छितो की २९ मे २०२५ रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मराठवाडा विभागातील हिंगोली जिल्ह्यात विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी नव्या तालुका निर्मितीच्या प्रश्नाला हात घातला. त्यांनी राज्यातील काही नव्या तालुक्यांच्या निर्मितीला चालना दिली जाणार आणि हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव आणि आखाडा बाळापूर या नव्या तालुक्यांची निर्मिती होणार असे संकेत दिले आहेत.

या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्ह्यातील गोरेगाव या अप्पर तालुका निर्मितीची घोषणा केली होती आणि या ठिकाणी आता तालुका दर्जाच्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील अशी घोषणा केलेली आहे. एवढेच नाही तर, पुढील काळात महाराष्ट्रातील इतर तालुक्यांच्या निर्मिती सोबतच गोरेगाव तालुका बनवला जाईल अशी ही घोषणा त्यांनी यावेळी केली आहे.
दरम्यान, हिंगोलीमधील आखाडा बाळापूर तालुक्याबाबत सुद्धा माहिती घेणार असेही आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिलेले आहे. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खरंच राज्यात नवीन तालुक्यांची निर्मिती करणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.