पाकिस्तानमध्ये कोणत्या ९ ठिकाणी हल्ले झाले? किती आतंकवादी मारले गेले? ऑपरेशन सिंदूरच नाव का ठेवलं? आता सगळी माहिती आली समोर….


नवी दिल्ली : भारतीय लष्करानं पाकिस्तानातील तब्बल ९ दहशतवादी तळांवर हल्ला करुन, पाकिस्तानच्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर तर दिलं, पण त्यासोबतच पहलगाममध्ये मृत्यूमुखी पडलेल्या २६ पर्यटकांनाही न्याय दिला आहे.

पहलगाम आतंकवादी हल्ल्याचा बदला घेताना भारताने अखेर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील आणि पात्र काश्मीरमधील नऊ ठिकाणी हवाई हल्ले करत पन्नास दहशतवाद्यांचा खात्मा केला. भारताने पाकव्याप्त काश्मीर मधील दहशतवादी तळ या निमित्ताने उध्वस्त केले आहेत.

या खास एअर स्ट्राइकसाठी ऑपरेशन सिंदूर हे नाव देण्यात आले होते. पहाटेच्या दोन वाजता भारताने हा एअर स्ट्राईक केला. पाक व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तान मधील नऊ ठिकाणी हे हल्ले करण्यात आले. पाकिस्तानच्या १०० किलोमीटर सीमेत आत जाऊन हे हल्ले करण्यात आले. तर पाकव्याप्त काश्मीरमधील मुजफ्फराबाद, मदीरके, कोटली हे ठिकाणे लक्ष्य करण्यात आली.

दरम्यान, या हल्ल्यानंतर भारतीय परराष्ट्र खात्याने अमेरिका रशिया, सौदी अरेबिया आणि जगातील इतर देशांना याची माहिती दिली. या हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलाने एक्स या अकाउंट वर माहिती देतानाच प्रहाराय संन्निहिता: जयाय प्रशिक्षित: या संस्कृत सुभाषिताचा उल्लेख केला होता याचा अर्थ असा की आम्ही हल्ल्यासाठी तयार आहोत आणि जिंकण्यासाठी देखील!

पहेलगाम मधील आतंकवादी हल्ल्यांमध्ये अनेक महिलांनी आपले पती गमावले. जाणीवपूर्वक आतंकवाद्यांनी पुरुषांना या घटनेत मारले होते. त्याचे प्रतीक म्हणून या महिलांच्या सन्मानार्थ ऑपरेशन सिंदूर हे नाव या मोहिमेला निवडले आणि पहलगाममधील आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सर्वांच्या प्रती भारत किती संवेदनशील आहे हे देखील दाखवून दिले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!