धनंजय मुंडेंनी केला होता वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करण्याचा प्रयत्न? निलंबित PSI अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा…


बीड : राज्यात गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्हा मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. बीडमध्ये घडलेल्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे राजकीय वातावरण देखील मोठ्या प्रमाणावर तापल्याचं पहायला मिळाले आहे. याचदरम्यान बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी केलेल्या दाव्यानं खळबळ उडाली आहे.

कासले यांच्या म्हणण्यानुसार, धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराड याचा एन्काऊंटर करण्याचा प्रयत्न केला होता. एका नव्याने व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये रणजीत कासले म्हणतात, वाल्मिक कराड मुंडेंचे अंडी-पिल्ली बाहेर काढणार होते, त्यामुळे त्यांचा एन्काऊंटर करण्याची योजना होती.

या दाव्यानंतर सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. कासले यांनी यावेळी सांगितले की, संतोष देशमुख प्रकरणातील अनेक पुरावे दाबले गेले आणि त्यामुळेच धनंजय मुंडे यांना मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा असल्याने ते सहआरोपी ठरणार नाहीत. महाराष्ट्र पोलिसांनी मला पकडून दाखवावं, असं आव्हानही त्यांनी दिले आहे.

कासले पुढे म्हणाले, “मला वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरसाठी पाच, दहा आणि पन्नास कोटींच्या ऑफर्स देण्यात आल्या. मी सायबर विभागात होतो, त्यांना माहित होतं की मी हे करु शकतो. पण मी माझा मोठेपणा सांगत नाही.

या सगळ्या प्रकरणात कासले यांनी स्पष्टीकरण देत म्हटले की, माझा कोणत्याही समाजाला दुखावण्याचा हेतू नव्हता. जर काही आक्षेपार्ह बोललो गेलं असेल, तर मी त्याबद्दल माफी मागतो. असे ते म्हणाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!