नाथांच्या समाधीला व पांडूरंगाला चंदन- उटीचा लेप, उन्हाची दाहकता वाढल्याने निर्णय…

पैठण – सध्या एप्रिल महिण्यात राज्यात उन्हाचा तडाका जाणवू लागलाय. पैठण येथील नाथमंदीरातील विजयी पांडूरंग व नाथ महाराज समाधीला चंदन उटीचाचा लेप लावण्यास सुरवात झालीय. उन्हाच्या दाहापासुन होणारा त्रास कमी व्हावा म्हणून याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
मृग नक्षत्र निघेपर्यंत दररोज देवाला ही चंदन उटी लावण्यात येते. सामान्य माणसाबरोबरच देवालाही ऋतू मानानुसार त्रास सहन करावाच लागतो देवाला या उन्हाचा त्रास कमी व्हावा या हेतुने ही पुजा केली जाते. याठिकाणी भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावत असतात.
पुजा करण्याची संधी भाविकानां मिळते. या पुजेचे खुप महत्व असून भाविक चंदन उटी पुजेची आवर्जून प्रतिक्षा करतात वसंत ऋतुपासुन शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराज यांच्या राहत्या वाड्यात (गावातील नाथ मंदिरात ) नाथांच्या नित्यपुजेतील विजयी पांडुरंगांची नितांत सुंदर मुर्ती आहे. ही मूर्ती फार प्राचीन आहे.
या मुर्तीला चंदन उटीचा लेप लावण्यात आली आहे. देवालाही ऋतू मानानुसार त्रास सहन करावाच लागतो देवाला या उन्हाचा त्रास कमी व्हावा या हेतुने ही पुजा केली जाते. अनेक लोक मोठ्या भक्तिभावाने याठिकाणी दर्शनाला येत असतात.