पुण्याला मिळणार अजून दोन आमदार, पाच जागांसाठी इच्छुकांनी लावली पक्षश्रेष्ठींकडे फिल्डिंग, ‘या’ दोघांची आमदारकी फिक्स?


पुणे : सध्या राज्यात विधान परिषद निवडणुका जाहीर झाल्या आहे. ही निवडणूक विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये भाजप तीन, शिवसेना एक आणि अजित पवार राष्ट्रवादी एक अशा पाच जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. यामुळे यासाठी इच्छुकांनी फिल्डिंग लावली आहे.

विधान परिषदेच्या या पाचही जागांसाठी महायुतीमध्ये मित्रपक्षांत मोठ्या प्रमाणात रस्सीखेच सुरू आहे. विधान परिषदेचा आमदार होण्यासाठी आता इच्छुकांची यादी मोठी आहे. अनेकांना विधानसभा निवडणुकीत माघार घ्यावी लागली, यामुळे आता सगळेच पुढे आले आहेत. पुण्यातील दोन नेते सुद्धा विधानपरिषदेच्या आमदारकीसाठी दावेदार आहेत.

यामध्ये अजित पवार यांच्या गटाकडून दीपक मानकर यांनी विधान परिषदेच्या आमदारकीसाठी दावा केला. मागील विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी सुद्धा मानकर यांनी संधी मिळावी, म्हणून वरिष्ठांकडे मागणी केली होती. मात्र डावलल्यानंतर मानकरांनी थेट राजीनामा दिला होता. यामुळे यावेळी त्यांचे नाव फिक्स मानलं जात आहे.

तसेच विधानसभा निवडणुकीच्या वेळी अजित पवारांनी जगदीश मुळीक यांना शब्द दिल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता त्यांना उमेदवारी दिली जाण्याचा दाट अंदाज आहे. त्यामुळे आता पुण्याला दोन आमदार मिळणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. लवकरच याबाबत घोषणा होईल.

याबाबत दीपक मानकर म्हणाले, मी विधान परिषदेच्या आमदार पदासाठी पक्षाकडे दावा केला आहे. अजित पवार हे योग्य निर्णय घेतील. काम करणाऱ्या माणसाच्या पक्ष हा उभा असतो. अजित पवार जो निर्णय घेतील, तो मला मान्य असतो, संधी मिळाली नाही तरी दादासोबत काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!