इंदापूरमध्ये प्रवीण माने देणार सर्वांनाच धक्का! माने भाजपच्या वाटेवर, फडणवीसांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण…

इंदापूर : इंदापूर येथील सोनाई उद्योग समूहाचे संचालक आणि जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य बांधकाम सभापती प्रवीण माने हे लवकरच भाजपात जाण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून याबाबत चर्चा सुरू आहे. प्रवीण माने यांनी यावेळी झालेले विधानसभा निवडणूक लढवली होती. सुरुवातीला ते शरद पवार गटाकडून निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले जात होते.

असे असताना मात्र अचानक हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्याने प्रवीण माने नाराज झाले. यामुळे त्यांनी परिवर्तन आघाडीची स्थापना केली, मात्र त्यात देखील फूट पडल्याने त्यांनी अपक्ष म्हणून आपला अर्ज कायम ठेवला तसेच मोठ्या प्रमाणावर प्रचार केला होता. यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
नंतर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला असला तरी त्यांनी मोठ्या प्रमाणावर मतदान घेतलं होतं. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा पराभव देखील याच कारणामुळे झाला. तिरंगी लढतीमध्ये मतांचे विभाजन झाल्यामुळे दत्तात्रय भरणे विजयी झाले. त्यानंतर प्रवीण माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.

यामुळे ते लवकरच भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा सुरू झाली आहे. सोनई उद्योग समूहाच्या माध्यमातून प्रवीण माने यांची ओळख आहे. या माध्यमातून त्यांनी अनेकांना रोजगार दिला असून या उद्योग समूहावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे अनेकांचे जीवनमान अवलंबून आहे. प्रवीण माने यांचे वडील दशरथ माने हे शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. मात्र विधानसभा निवडणुकीत प्रवीण माने यांना तिकीट नाकारल्यानंतर ते नाराज झाले होते.
यामुळे प्रवीण माने यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती यामध्ये त्यांना जवळपास 40 हजार एवढे मतदान झाले होते. प्रवीण माने यांचे तालुक्यातील राजकारणावर चांगले वजन असून ते सतत लोकांच्या संपर्कात असतात. तालुक्यातील कोणत्याही कार्यक्रमाला ते आवर्जून उपस्थिती लावतात. येणाऱ्या काळात ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा आहे.
भाजप नेत्यांची देखील त्यांनी भेट घेतली असून जवळीकता वाढली आहे. यामुळे इंदापूरच्या राजकारणात येणाऱ्या काळात अनेक घडामोडी घडण्याचे शक्यता आहेत. याबाबत अधिकृत माहिती समोर आली नसली तरी दबक्या आवाजात पक्ष प्रवेशाच्या चर्चा सुरू आहेत. यामुळे येणाऱ्या काळात काय घडणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.