पुण्यातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती कोण? नाव आणि मालमत्ता ऐकून वाटेल आश्चर्य, जाणून घ्या…


पुणे : पुण्यातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचे नाव आहे सायरस पूनावाला. लस निर्मिती करणारी कंपनी सिरम इन्स्टीट्यूटचे मालक असलेले सायरस पूनावाला हे पुण्यातील एकमेव श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर संपत्ती असून त्यांचे जगात औषधे आणि लस क्षेत्रातील नाव आहे. सायरस एस. पूनावाला आणि कुटुंब एकूण 2.90 लाख कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत.

कोरोनावर कोणतचं औषध नव्हते तेव्हा सीरम इन्स्टिट्यूटने कोरोनाविरोधात लस तयार केली. कोरोना विरोधात लस निर्माण करुन सीरम इन्स्टिट्यूटने संपूर्ण जगाला आशेचा किरण दाखवला. नंतर ही लस बाजार आली आणि कोरोना देखील गेला. त्यांच्या अनेक लसी संपूर्ण जगात जातात. अनेक आजारावर त्यांच्या लसी आहेत.

या ₹बद्दल सायरस पूनावाला यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. सीरमचे सीईओ आणि सायरस पूनावाला यांचा मुलगा आदर पूनावाला यांच्या नेतृत्वाखाली, कंपनीने कोविड-19 लस तयार केली. यावेळी अनेक देशात ही लस वापरली गेली. यामुळे अनेकांचे जीव वाचले.

लस निर्मिती करणारी कंपनी सीमर इन्स्टीट्यूटचे मालक एस. पूनावाला देशातील श्रीमंतांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहेत. तर सन फॉर्मास्युटिकल्सचे मालक दिलीप सांघवी पाचव्या स्थानावर आहे. गेल्या पाच वर्षात सहा उद्योगपती असे आहेत जे भारताच्या टॉप-10 अरबपतींमध्ये कायम आहेत.

दरम्यान, रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. अंबानी यांच्याप्रमाणेच मुंबईत अनेक श्रीमंत व्यक्ती आहेत. तसेच पुण्यात देखील श्रीमंतांची संख्या कमी नाही. पुनावाला यांनी सामाजिक क्षेत्रात देखील आपले योगदान दिले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!