महिलांसाठी आनंदाची बातमी! महिलादिनी पीएमपीची मोफत सेवा, जाणून घ्या….


पुणे : खास महिलांसाठी सुरू केलेल्या तेजस्विनी बसमधून महिलांना महिलादिनी मोफत प्रवास करता येणार आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपीएमएल) जागतिक महिला दिनानिमित्त (ता.७) पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील १३ मार्गांवर ही मोफत सेवा दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

पीएमपीएमएल व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिलेल्या आदेशानुसार, पीएमपीच्या स्वारगेट, न. ता. वाडी, कोथरूड, कात्रज, हडपसर, अप्पर, पुणे स्टेशन, निगडी, पिंपरी आणि भोसरी या आगारातून या तेजस्विनी बस सोडण्यात येणार आहेत.

दरम्यान, त्यांच्या दिवसभरात जवळपास ४२ फेऱ्या होणारआहेत. महिला प्रवाशांना तात्काळ आणि मोफत सेवा उपलब्ध व्हावी यासाठी एकाही मार्गावर तेजस्विनी बस बंद न ठेवता सेवा सुरळीपणे सुरू रहावी, अशा सूचना सर्व आगार व्यवस्थापकांना देण्यात आल्या आहेत.

या तेजस्विनी बसमध्ये महिला वाहक सेवकांची नेमणूक करण्यात यावी. आगार प्रमुखांनी मार्गावरील बसस्थानकावर उपस्थित राहून महिलांना गुलाब पुष्प देऊन महिला दिनाच्या शुभेच्छा द्याव्यात. या बसमधून केवळ महिला प्रवाशांनाच प्रवेश देण्यात यावा, असा सूचना पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

आगारनिहाय महिला स्पेशल (तेजस्विनी) बस मार्ग आणि फेऱ्या…

स्वारगेट ते हडपसर – ५
स्वारगेट ते धायरेश्वर मंदिर – २
कोथरूड डेपो ते पुणे स्टेशन – २

एनडीए गेट क्रमाअंक १० ते मनपा – २
कात्रज ते महाराष्ट्र हौसिंग बोर्ड – ७
कात्रज ते कोथरूड डेपो – ६

हडपसर ते वारजे माळवाडी – २
भेकराईनगर ते मनपा – २
मार्केटयार्ड ते पिंपळेगुरव – २
पुणे स्टेशन ते कोंढवा खुर्द – २

निगडी ते मेगा पाॅलीस हिंजवडी – ४
भोसरी ते निगडी – ४
चिखली ते डांगे चौक – २

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!