धनंजय मुंडेंना ६ महिन्यांनी पुन्हा मंत्रिपद मिळणार, ‘या’ नेत्याच्या वक्तव्याने उडाली खळबळ..

सोलापूर : सरपंच संतोष देशमुख यांची हाल हाल करुन हत्या करण्यात आल्याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर लोकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर राजीनामा न देण्यावर ठाम असलेल्या धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला आहे.

धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. पण आता पुढे काय? असा प्रश्न आता विचारला जात आहे. मुंडेंच्या जागी अन्य कुणाला संधी दिली जाणार आहे का? की ही जागा रिक्त ठेवून योग्य वेळी ती भरण्याची रणनिती राष्ट्रवादी काँग्रेसने आखली आहे. याची चर्चा सगळीकडे सुरू आहे.


हे प्रकरण इतकं गंभीर आहे की मुंडेंना त्यांच्या राजकीय कारकीर्दीवर त्याच नक्कीच परिणा होणार आहे. असे असले तरी पुढच्या सहा महिन्यात याच धनंजय मुंडेंचे राजकीवर पुनर्वसन केले जाईल असं वक्तव्य एका नेत्याने केले आहे. या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे.
धनंजय मुंडे यांचा राजीनामा हे सर्व नाटक आहे. त्यांना पुढच्या ६ महिन्यात परत राज्यमंत्री मंडळात घेतलं जाईल असं वक्तव्य काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे. धनंजय मुंडे हे अजित पवारांचे अतिशय जवळचे समजले जातात.
त्यामुळे त्यांचे कमबॅक होवू शकतो अशी ही चर्चा आहे. शिवाय राजीनामा घ्यायचा होता तर आधीच का घेतला नाही असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे शिंदे यांनी केलेल्या वक्तव्याला शंका घेण्याची जागा आहे.
