‘दादा मला मारु नकोस’, स्वारगेटच्या नराधमाने कसा डाव साधला? पीडितेने अखेर सगळं सांगितलं..


पुणे : स्वारगेट एसटी स्टँडवरील उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये अत्याचार केलेल्या तरुणीने पोलिसांना दिलेला जबाब अखेर समोर आला आहे. तरुणीनं आरोपीकडे हात जोडून याचना केली होती. आरोपी दत्ता गाडे याने अत्याचार करण्यापूर्वी तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती.

तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न करत ‘मी तुला ठार मारेन’, असे म्हणत जबरदस्ती केली. जीव वाचवण्यासाठी पीडित तरुणीने त्याला गयावया केल्या आणि ‘दादा, मला मारू नका’, अशी विनवणी केली होती. आरोपीने धमकावून तिला शांत राहण्यास भाग पाडले, असा धक्कादायक तपशील तिच्या जबाबात समोर आला आहे.

तसेच तपास अधिक बळकट करण्यासाठी पोलिसांनी पीडितेचे फलटणला जाण्यासाठी घेतलेले बस तिकीट पुरावा म्हणून जमा केले आहे. आरोपीने तिला दिशाभूल करून बस डेपोतील निर्जनस्थळी नेले आणि तेथील रिकामी ‘शिवशाही’ बस फलटणला जात असल्याचे सांगून तिला आत चढण्यास भाग पाडले. त्यानंतर बसचे दार बंद करून त्याने अत्याचार केला.

दरम्यान, याशिवाय, आरोपी दत्ता गाडेच्या मोबाईलचा तांत्रिक तपास सुरू आहे. प्राथमिक तपासणीत पीडित आणि आरोपी यांच्यात पूर्वी कोणताही संवाद किंवा ओळख नव्हती, हे समोर आले आहे. पोलिसांनी ज्या बसमध्ये हा प्रकार घडला ती बसही फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवली असून, आरोपीविरुद्ध ठोस पुरावे गोळा करण्याचे काम वेगाने सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!