आमचे सहमतीने संबंध, मी अत्याचार केला नाही!! पोलिसांनी अटक करताच दत्ता गाडेचा मोठा गौप्यस्फोट…

पुणे : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये तरूणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेने प्रचंड खळबळ माजली. याप्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा गेल्या तीन दिवसांपासून फरार होता. अखेर पोलिसांनी तपासाची चक्रं वेगाने फिरवत त्याला अटक केली आहे. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

याबाबत त्याने धक्कादायक खुलासा केला आहे. आमचे सहमतीने संबंध, मी अत्याचार केला नाही. असा गौप्यस्फोट त्याने केला आहे. यामुळे पोलिसांनी आता तपास सुरू केला आहे. याप्रकरणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काल पुण्याच्या घटनेची सर्वांनी निषेध केला. नराधमाला अटक झाली पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो.


त्याला रात्री १ वाजता अटक केली. पोलिसांच्या ताब्यात आहे. चौकशी सुरू आहे. आज कोर्टात त्याला हजर केलं जाणार आहे. त्यातून काय वस्तुस्थिती आहे. हे निष्पन्न होईल, असे अजित पवार म्हणाले. मी सकाळी सीपींशा बोललो. आरोपीला काल रात्री १ वाजता ताब्यात घेतले आहे. चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
पण चौकशी सुरू असताना आरोपी हा इकडे गेला, तिकडे गेला असं मीडियावाले चालवतात. जी विकृत व्यक्ती असते तिला पकडण्यासाठी वेगळ्या बातम्या दिल्या तर अमूक राज्यात अमूक व्यक्ती गेली, राज्यात गेली, जिल्ह्यात गेली असं सांगितलं जातं मात्र अशा बातम्या देताना तारतम्य बाळगलं पाहिजे.
अन्यथा त्या माहितीचा विकृत आरोपी फायदा घेऊ शकतात, असे म्हणत अजित पवारांनी मीडियालही फटकारले. तसेच आम्हीही राजकीय लोकांनी तारतम्य ठेवलं पाहिजे. दोषीला पकडण्यासाठी बातम्यांचा उपयोगझाला पाहिजे, त्याला स्वतला लपवण्यासाठी होता कामा नये असंही अजित पवारांनी सुनावलं आहे.
