पाहुण्यांकडे पाणी प्यायला गेला अन् अडकला! दत्तात्रय गाडेला अखेर अटक, मध्यरात्री रंगला थरार….

पुणे : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये का तरूणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेने प्रचंड खळबळ माजली. याप्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा गेल्या तीन दिवसांपासून फरार होता. अखेर पोलिसांनी तपासाची चक्रं वेगाने फिरवत त्याला अटक केली आहे.

दत्तात्रय गाडे शिरूर येथील गुनाट गावातील एका शेतात लपलेला होता. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी १३ पथकं तयार केली होती आणि त्याच्या शोधासाठी डॉग स्क्वॉड आणि ड्रोनचा वापर करण्यात आला. अखेर त्याचे लोकेशन ट्रेस झाल्यानंतर गावात १०० पोलिसांची तैनाती केली होती, त्यामुळे आरोपी पळून जाऊ शकला नाही.
दत्तात्रय गाडे याची अटक करण्यासाठी पोलिसांनी अनेक तास शोध मोहीम सुरू केली होती. रात्री ११:४५ वाजता, गाडे एका घरात पाणी पिण्यासाठी गेला, त्यावेळी घरातील महिलेला त्याची ओळख पटली आणि तिने पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी त्वरित ३० मिनिटांच्या आत चारही बाजूंनी गाडे याला घेरले आणि ड्रोनद्वारे त्याला बाहेर येण्याची चेतावणी दिली. आरोपी कॅनालच्या खड्ड्यात लपला होता, मात्र पोलिसांच्या सुसंगठित कार्यामुळे त्याला पकडण्यात यश आले. मध्यरात्री १. २० च्या सुमारास पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.
गुनाट गावातील ग्रामस्थांच्या मदतीने त्याला अटक केली. तो एका कॅनॉलमध्ये लपून बसल्याची माहिती मिळाली होती. गावातल्या शेतात अनेक तास शोधमोहिन केल्यानंतर अखेर त्याच शोध लागला. पोलिसांनी शेत पिंजून काढत त्याला बेड्या ठोकल्या. सध्या आरोपीला लष्कर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये आणून ठेवलं आहे. आज सकाळी ११ वाजता त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे.