ऑफिसमध्ये क्षणभर डुलकी घेऊ शकतो की नाही?, हायकोर्टाच्या निर्णयानं बॉसचीही उडेल झोप…


बंगळुरू : येथून कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कर्नाटकातील एक कॉन्स्टेबल चंद्रशेखरचा व्हिडिओ कामाच्या वेळी डुलकी घेताना व्हायरल झाला होता. त्यानंतर कॉन्स्टेबलला नोकरीवरून काढण्यात आले. या विरोधात त्याने हायकोर्टात धाव घेतली. यावर एक महत्वपूर्ण निकाल कोर्टाने दिला आहे.

सुनावणी करताना न्यायाधीशांनी संविधानानुसार लोकांना झोपण्याचा आणि आराम करण्याचा अधिकार आहे. वेळोवेळी आराम आणि झोपेचे महत्त्वही न्यायाधीशांनी सांगितले. या प्रकरणात याचिकाकर्त्याला कामाच्या ठिकाणी झोप लागली हा गुन्हा मानला जाऊ शकत नाही, असे न्यायाधीशांनी म्हटले. यामुळे कर्मचाऱ्याला मोठा दिलासा मिळाला आहे.

याबाबत कोर्टाने केकेआरटीसीने दिलेला निलंबनाचा आदेश रद्द केला. या प्रकरणी कोर्टाने राज्य परिवहन प्रशासनालाच फटकारले. चंद्रशेखर कर्नाटक राज्य परिवहन महामंडळात एक ट्रान्सपोर्ट कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होता. निलंबित केलेल्या चंद्रशेखरने त्याच्या याचिकेत सलग २ महिने १६ तास शिफ्ट केल्यानंतर १० मिनिटांची डुलकी लागल्याने मला कामावरून काढण्यात आल्याचे सांगितले.

दरम्यान, कामाच्या दबावामुळे चंद्रशेखर यांना २ शिफ्टमध्ये काम करावे लागत होते. यामुळे त्यांना झोप लागली.मानवाधिकाराच्या कलम २४ मध्ये सर्वांना आराम आणि सुट्टीचा अधिकार मिळाला आहे. त्यानुसार कोर्टाने निर्णय दिला आहे. अधिकारात कामाच्या तासांची योग्य वेळ आणि पगारासह सुट्ट्यांचा समावेश आहे.

कामाच्या तासांमध्ये दिवसाला ८ तास आणि आठवड्याला ४८ तासांहून अधिक नसावे असे कायद्यात आहे. यानुसार कोर्टाने निर्णय दिला आहे. यामुळे या कर्मचाऱ्याला मोठा दिलासा मिळाला. यामुळे त्याला पुन्हा एकदा कामावर घेतले जाणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!