संतोष देशमुख यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत….!! सुरेश धस यांची कुटूंबियांची भेट घेऊन केली मोठी घोषणा


बीड : बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आल्याने राजकीय वातावरण तापले आहे. याबाबत कारवाईची मागणी केली जात आहे. अनेक दिवस झाले तरी अजून कारवाई होत. यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत.

या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी काल मस्साजोगमध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची तसेच ग्रामस्थांची भेट घेतली. या भेटीनंतर आता त्यांनी आज मोठी घोषणा केली आहे.

धस म्हणाले, संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळत नाही, तोपर्यंत स्वागत सत्कार स्वीकारणार नाही, अशी घोषणा त्यांनी केली आहे. एका कार्यक्रमामध्ये त्यांनी सत्कार नाकारला आहे. जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात न्याय मिळत नाही, तोपर्यंत आपण सत्कार स्विकारणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मंत्री जयकुमार गोरे यांची धाराशिवचे जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. तसेच भाजप नेते सुजितसिंह ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी सत्कार नाकारला आहे. आमदार सुरेश धस या कार्यक्रमाला उपस्थित होते.

दरम्यान, काल त्यांनी मस्साजोगमध्ये जाऊन पुन्हा एकदा संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची आणि तेथील ग्रामस्थांची भेट घेतली. ग्रामस्थांचा आपल्याला पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले. परळी दौऱ्यात मात्र त्यांना विरोध झाल्याचं पाहायला मिळालं. यामुळे वातावरण तापले होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!