राजेशिर्के घराण्याची बदनामी थांबवा अन्यथा 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा टाकणार! घराण्याचा थेट इशारा, फितुरी कोणी केली? सगळंच सांगितलं…


पुणे : काही दिवसांपूर्वी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित छावा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला मोठं यश सध्या मिळत असून अजूनही हा चित्रपट हाऊसफुल होत आहे. असे असताना चित्रपट रिलीज झाल्यापासून याबाबत वाद सुरू झाला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या चित्रपटात राजेश शिर्के यांच्या पूर्वजांची आणि परिवाराची बदनामी केल्याचा आरोप शिर्के घराण्याच्या वतीने दीपक राजेश शिर्के यांनी केला आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत. यामुळे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि निर्मात्यांना देखील आम्ही नोटीस पाठवणार असून गुन्हे दाखल करणार आहोत, असे सांगितले.

राजे शिर्के परिवाराची होणारी बदनामी टाळायची असेल, तर तसेच खोटे सीन वगळावेत, नाहीतर आम्ही शंभर कोटीचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकू असा इशारा शिर्के परिवाराने दिला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. छत्रपती संभाजी महाराज हे गद्दारी झाल्याने पकडले गेले असा इतिहास आहे, तसं या चित्रपटात सांगितलं आहे.

याबाबत ते म्हणाले, राजेशिर्के घराण्याचे अजूनही छत्रपती घराण्याची चांगले संबंध असून छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलाला राजेशिर्के यांची मुलगी दिली. त्यानंतर आतापर्यंत छत्रपती घराण्याशी तेरावेळा सोयरीक झाल्याची आठवण दीपक राजेशिर्के यांनी करून दिली.

तसेच ते म्हणाले, वतनदारीचाच मुद्दा घ्यायचा असेल तर शिर्के घराणे हे छत्रपती शिवराय संभाजीराजे यांच्या आधी साडेतीनशे वर्षांपासून राजे होते. रायगड सुद्धा शिर्केंकडे 300 वर्ष होता. कोकण आणि मुंबईच्या भागाला पूर्वी शिरकाण असे म्हटले जायचे, असेही ते म्हणाले. यामुळे वाद निर्माण झाला आहे.

तसेच ते म्हणाले,हा भाग स्वराज्यात विलीन करण्यासाठी शिर्के घराण्यानेच विश्वासाने छत्रपती कडे दिला होता. संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायाखाली ज्याला दिले, त्याच्याच नातवाने 122 वर्षांनी बखर लिहीलेली आहे. त्याच्या डोक्यात द्वेष नसेल का? असेही ते म्हणाले. यामुळे आता यावरून येणाऱ्या काळात हा वाद अजूनच वाढण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!