सणसरच्या सरपंचपदी यशवंत नरुटे यांची निवड! कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष…


इंदापूर : इंदापूर तालुक्यातील मोठी आणि महत्त्वाची ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या सणसर ग्रामपंचायतच्या सरपंचपदी यशवंत नरूटे यांची आज निवड करण्यात आली. माजी सरपंच पार्थ निंबाळकर यांनी राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती.

आज सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत यशवंत नरुटे यांची सरपंच पदी निवड करण्यात आली. भवानीनगर वार्डमधून ते ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडणून आले होते. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत फटाक्यांची आतषबाजी केली.

मावळते सरपंच पार्थ निंबाळकर यांनी काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता. त्यानुसार आज सरपंच पदाची निवड करण्यासाठी सणसर ग्रामपंचायत कार्यालय येथे सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ देखील उपस्थित होते. यावेळी वरिष्ठांनी यशवंत पाटील यांचे नाव सुचवल्याने त्यांची निवड करण्यात आली.

यावेळी ग्रामस्थ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवडीबद्दल तालुक्याचे आमदार आणि क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी यशवंत नरुटे यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. सणसर ही ग्रामपंचायत तालुक्यातील एक महत्त्वाची ग्रामपंचायत असल्याने आज सरपंच म्हणून कोणाची निवड होणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!